पोस्ट्स

डिसेंबर २८, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

वस्तुस्थिती माहित होण्यासाठी वाचावेच असे पुस्तक, "शोध नेहरु गांधी पर्वाचा,"

इमेज
नेहरु गांधी घराणे, भारताच्या राजकारणाचा पटलावर सातत्याने चर्चेत असणारे एक राजकीय घराणे .पुर्वी सत्तेच्या केंद्रस्थानी असलेले हे घराणे सध्या त्यांनी त्याचा कार्यकाळात केलेल्या आणि न केलेल्या गोष्टींमुळे चर्चेत असते. ‌व्हाटसप युनिव्हर्सिटीच्या सध्याचा काळात त्यांच्याविषयी अनेक बाबी पुर्वी दडवून ठेवलेला इतिहास या नावाखाली चवीने चघळत पुढे पाठवल्या जातात. भारताच्या लोकशाहीच्या इतिहासातील, तसेच भारताच्या  स्वातंत्र्य लढ्यातील एक मोठा टप्पा त्यांनी व्यापलेला असल्याने त्यातील सत्यता बघणे आवश्यक ठरते. त्यासाठी  त्यांचे वस्तूनिष्ठ चरित्र अभ्यासणे आवश्यक आहे. ही गरज पुर्ण करते ज्येष्ठ पत्रकार 'सुरेश भटेवरा' यांनी लिहिलेले "शोध गांधी नेहरु पर्वाचा",  हे पुस्तक. विविध वर्तमानपत्रात संपादकीय विभागात वरिष्ठ पदावर काम केलेल्या, आणि दिल्लीतील राजकारण त्यातही काँग्रेसचे राजकारण जवळून बघितलेल्या ज्येष्ठ पत्रकार सुरेश भटेवरा यांच्या लेखनीतून उतरलेले हे पुस्तक  गांधी नेहरु घराण्याविषयी आपल्या अनेक धारणा कस्या चूकीच्या आहेत, हे सोदाहरण स्पष्ट करते.नाशिकमधील नामवंत सांस्कृतिक सं