पोस्ट्स

ऑगस्ट १३, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

एक राष्ट्र एक निवडणूक निव्वळ अशक्यच

सध्या एक राष्ट्र एक निवडणूक या संकल्पनेवर विचारमंथन सुरु आहे . माझ्या मते ही संकल्पना राबवतांना येणाऱ्या खर्चाबाबत फक्त भाष्य केले जाते  जे या प्रश्नाची फक्त एकच बाजू दशर्वते . प्रत्येक प्रश्नाला दोन बाजू असतात ,    त्यातील दुसऱ्या बाजूचा लेखाजोखा मांडण्यासाठी लेखनप्रपंच आपल्या कडे ईव्हीएम यंत्रामार्फत निवडणूका घेतल्या जातात . सध्या भिन्नभिन्न वेळी निवडणूका घेत असल्याने एकच इव्हीएम यंत्र वारंवार वापरता येते . एकत्रच निवडणूका घेत असल्यास किती ईव्हीएम मशीन लागतील, आणि एकदा वापरल्यावर परत पाच वर्षांनीच त्याचे काम, येवढी यंत्रे सांभाळयाची ती कशी ? आणि आपल्याकडील एका ईव्हीएम मशीनमध्ये एका वेळी फक्त सोळा नावे अंतर्भुत करता येतात . देशातील पक्षांची आणि अपक्षांची यादी बघता यावर कात्री लावल्याशिवाय एका इव्हिएम वर सर्व नावे येणे अशक्यच, म्हणजे लोकशाहीच्या तत्वावरच घाला घालावा लागणार . म्हणजेच ही संकल्पना कितीही स्त्युत असली तरी राबवतांना अनेक अडचणी येणार . त्यावर तोडगा काढल्याशिवाय ही संकल्पना राबवणे धोक्याचे ठरेल यात शंका नाही