पोस्ट्स

जुलै २, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

स्वामी विवेकानंद भगव्या कपड्यांना नवा अर्थ देणारे व्यक्तीमत्व

इमेज
       स्वामी विवेकानंद यांचे नाव ऐकलेले नाही, असा खचितच कोणी भारतात असेल.येत्या रविवारी अर्थात 4 जूलै त्यांची 119वी पुण्यतिथी, त्यानिमित्ताने त्यांना विनम्र आदरांजली.                 स्वामी विवेकानंद यांनी संन्यास्याश्रमाला व्यापक अर्थ दिला. संन्याशी म्हणजे समाजापासून दूर झालेला मोक्ष मिळण्यासाठी सर्व परीत्याग करुन, इश्वरभक्तीत गुंतलेला व्यक्ती ही ओळख पुसून, संन्यासी म्हणजे समाजाला प्रचंड प्रमाणात विविध प्रकारे मदत करणारा व्यक्ती ही नवी ओळख दिली. त्यासाठी त्यांनी रामकृष्ण मठ आणि रामकृष्ण मिशन यांची उभारणी केली. मी स्वतः पुण्यात असताना रामकृष्ण मठाच्या विविध समाजोपयोगी सेवांचा फायदा घेतला आहे. अत्यंत माफक दरात वैद्यकीय सेवांसह विविध प्रकारच्या कार्यामुळे  युवकांची उन्नती होण्यासबंधी विविध उपक्रम रामकृष्ण मठाद्वारे राबवले जातात. मी रामकृष्ण मठाच्या जानेवारी महिन्यातील युवा शिबिरास तसेच त्यावेळेस दर रविवारी युवकांसाठी असणाऱ्या कार्यक्रमांस उपस्थित राहत असे.( काही वर्षापुर्वी त्यांचाकडून दर रविवारचा उपक्रम बंद करण्यात आला आहे) तेथील स्वामीजी सहजसोप्या भाषेत युवकांना ताण तणाव सहन करण्याचा