पोस्ट्स

डिसेंबर ६, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मग हटवा कांदा जीवनावश्यकच्या यादीतून

इमेज
                     सध्या सर्वत्र कांद्याच्या वाढत्या किमतीने उच्छाद मांडला आहे . कांद्याच्या वाढत्या किमतीमुळे लोकांच्या जेवणातून कांदा बाजूला पडला आहे .  संसदेमध्ये सुद्धा या विषयावर चर्चा झाली . त्यावेळेस उत्तर देताना एका महत्वाच्या खात्याच्या कॅबिनेट मंत्र्यांनी मी कांदा लसूण खात नाही . त्याच्यामुळे त्याचा वाढलेल्या किमतीमुळे माझ्यावर काहीच परिणाम होत नाही . माझ्यासारखे अनेक लोक या देशात आहेत . कांदा हा जीवनावश्यक वस्तू नाही " असे उद्गार काढले . जर संबंधित मंत्र्यांचे विधान खरे मानले  तर काही प्रश्न निर्माण होतात . त्याचा उहापोह करण्यासाठी आजचे लेखन .                जर कांदा जीवनावश्यक वस्तू नसेल तर केंद्र सरकारतर्फे जीवनावश्यक वस्तूंचा यादीत कांद्याचा समावेश का करण्यात आला आहे ? कोणत्याही निवडणुकीपूर्वी कांद्यावर निर्यातबंदी का लादण्यात येते ? जर कांदा जीवनावश्यक वस्तू नसेल तर त्याची निर्यात करण्यावर शेतकऱ्यांवर विविध बंधने का हा प्रश्न यामुळे निर्माण झाला आहे . मित्रांनो जर शेतकऱ्यला जर कांदा परदेशात निर्यात करायचा असल्यास प्रचंड असे निर्यात मूल्य सरकारकडे भरावे लागते . प