पोस्ट्स

ऑक्टोबर ४, २०१५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

25 वर्षानंतर

या आठवड्यात एका मोठ्या घटनेस जीने जागतीक राजकारणात अमुलाग्र बदल केले , त्या घटनेस 25 वर्षे पुर्ण झाली . ती घटना म्हणजे पुर्व आणी पश्चीम जर्मनीचे एकञीकरण बर्लीनची ती ऐताहासिक भिंत पडणे . तसे बघायला गेले तर या घटनेचा आधीच्या दोन वर्षापासून जगात अनेक महत्वाचा घटना घडत होत्या . मग ते तिआनमेन चौकातील लोकशाही बाबतचे आंदोलन असो . किंवा त्यानंतर झालेले सेव्हीयत सोशालिस्ट रशियाचे पतन असो सारेच जागतीक राजकारण ढवळून काढणारे . (अर्थात भारतात काही वेगळी स्थिती नव्हती मंडल की कमंडलू हा वाद सर्वप्रथम याच काळात सुरु झाला . जो आतापरत सुरु होण्याची चिन्हे दिसत आहेत हार्दीक पटेल आणी काही संघटनांमुळे ,असो .) सध्या जग ज्या दहशतवादाने ग्रासले आहे त्या धार्मिक दहशतवादाची निर्मितीची सुरवात देखील याच काळाची . युनाटेड स्टेटस आँफ अमेरीकेची हूकुमशाहीपण याच काळात सूरू झाली , असो . भांडवलशाहीप्रधान पश्चीम जर्मनी विकसीत तर साम्यवादी विचारसरणीचा पूर्व जर्मनी अविकसीत . अश्या स्थितीत दोन्ही भागाचा विकास साधत आजचा जर्मनी उभा आहे . ज्याने पिग्स देशांच्या संकटातून यूरोपिय युनियनला वाचवण्याचे काम केले आणी आता भारताबरोबर ज