पोस्ट्स

माध्यमे लेबलसह पोस्ट दाखवत आहे

50 वर्षाचा सुवर्णकाळ

इमेज
    1972 आँक्टोबर 2 ही फक्त एक तारीख नाहीये. महाराष्ट्राचा एका नव्या युगात प्रवेश झाल्याची ती तारीख आहे. याच दिवशी मुंबईत दूरदर्शन केंद्राचा जन्म झाला.आज 2021 साली या घटनेला 49 वर्ष पुर्ण होवून 50वे वर्ष सुरु होईल. थोडक्यात मुंबईच्या वरळी या उपनगरात असणारे दुरदर्शन केद्र सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण करेल. त्यानिमित्ताने सर्व दुरदर्शन प्रेमींना मनःपूर्वक शुभेच्छा.       या 50 वर्षात पुलाखालून बरेच पाणी वाहुन गेले आहे. समाज प्रबोधनाबरोबर मनोरंजनासाठी एक  प्रयोग म्हणून सुरू करण्यात आलेल्या या वाहिनीने पुढे अनेक वर्ष टिव्हीवर मराठी भाषेतील एकमेव वाहिनी म्हणून अधिराज्य गाजवले.1994साली या केंद्राने सह्याद्री हे नाव धारण केले. त्यानंतर ही वाहिनी सह्याद्री या नावाने ओळखायला लागली.आजमितीस मराठीत अनेक 24 तास चालणाऱ्या वाहिन्या आहेत. मात्र त्या कोणाचीही सर दुरदर्शन सह्याद्रीस येणार नाही. आता आतापर्यत अनेकांच्या दिवसाची अखेर सातच्या बातम्यांनी होत असे ( माझी अजून देखील होते)  बातमी कितीही महत्तवाची असली, इतर वाहिन्यांपेक्षा आधी दाखवत असलो तरी काहीही आवेश न दाखवता...

मुद्दे त्यांचे .... मुद्दे आपले

इमेज
          मी आपणाशी बोलत असताना (13 सप्टेंबर ) युरोप खंडातील जर्मनी आणि उत्तर अमेरिका खंडातील कॅनडा या देशात सार्वत्रिक निवडणुकीमुळे समाजजीवन अक्षरशः ढवळून निघत आहे .जर्मनीमध्ये 26  सप्टेंबर आणि कॅनडामध्ये 20 सप्टेंबर रोजी निवडणुका होणार आहेत या निमित्याने तेथील राजकीय प्रचारात दंग आहेत . विरोधकांवर विविध मुद्यांवर टीका करत आहे मात्र हे करताना वैयक्तिक हेवे दाव्यांवर ते बोलताना दिसत नाहीये. विविध प्रसंगी त्यांनी त्यांनी घेतलेल्या भुमिकांवर ते टिका करत आहेत. ज्यामध्ये स्त्रीवाद, दहशतवाद, हवामान बदल या मुद्यांचा समावेश आहे. तेथील राजकीय पक्षांनी आपापले जाहिरनामे देखील प्रसिद्ध केले आहेत. ज्यामध्ये हवामान बदलाचा मुद्दा सर्वच राजकीय पक्षांच्या जाहिरनाम्यात अग्रभागी आहे.हवामान बदलाचा  जगात सर्वाधिक फटका आपणास बसलेला आहे, मात्र आपल्या येथील निवडणूकांमध्ये या मुद्द्याचा दुर दूरपर्यत समावेश नसतो,  हे आपण जाणतातच.               मी गेला आठवडाभर  DW , France24 आदी वृत्त वाहिन्यांचा या संदर्भातील बातम्या बघत आहे. य...

मी अनुभवलेल्या वृत्तवाहिन्या

इमेज
                 काल रात्रीची गोष्ट आहे . नेहमीप्रमाणे भारतीय मनोरंजन वाहिन्यांवर तसेच भारतीय वृत्तवाहिनीवर रटाळपणा सुरू असल्याने मी टिव्हीवर आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिन्या बघायला सुरवात केली .या सर्फिंग दरम्यान मला सिंगापूर येथील "चँनेल न्युज एशिया "या वृत्तवाहिनीवर Politics on climate change या नावाचा कार्यक्रम दिसला . त्या कार्यक्रमांमध्ये बदलत्या हवामान बदलामूळे पाकिस्तानातील गरीब जनतेला किती हाल अपेष्टांना सामोरे जावे लागतेय, गिलबिल बाल्टीस्तान, आझाद काश्मीर भागातील हिमनग किती वेगाने वितळत आहे. यावर भाष्य केले होते .कार्यक्रमात, काय सांगितले? कोणावर टिका, केली? यावर नंतर बोलेल .मला तूमचे लक्ष वेधून घेयचे आहे , ते कार्यक्रमाच्या विषयाकडे .                 चँनेल न्युज एशिया या वृत्तवाहिनीवरील अस्या कार्यक्रमाला रिपोर्ताज म्हणतात .भारतीय दुरचित्रवाणी वाहिन्यांवर "रिपोर्ताज " हा प्रकार फारच अभावाने दिसतो. त्यातही भारतात दिसतो तो दुरदर्शनचा डि डी इंडिया, डिडी भारती या वाहिन्यांवर . अन्य खासगी वृत्...

शताब्दी अग्रलेख आणि कायद्याची

इमेज
            आज 23 डिसेंबर 2019 ,आजच्याच दिवशी 100 वर्षापुर्वी म्हणजेच 23 डिसेंबर 1919ला भारतात एक वादळ उठले होते, या वादळाचे नाव होते माँटेग्स्यु -चेम्सफर्ड लाँ . याच कायद्याविरोधात लोकमान्य टिळकांनी त्यांचा "उजाडले पण सुर्य कुठे आहे " हा सुप्रसिद्ध अग्रलेख लिहला होता .त्या घटनेला आज 100 वर्ष पुर्ण होउन 101वे वर्ष सुरु झाले . मित्रांनो ही एक ऐतिहासिक घटना आहे .मात्र या घटनेची म्हणावी अशी    दखल घेण्यात आली नाही ,असे माझे निरीक्षण आहे, असो                 सन 1909 मध्ये  भारतीय नागरीकांना घटनेचा सुधारीत भाग दर दहा वर्षांनी देण्याचे ठरले त्यानुसार देण्यात आलेल्या या सुधारणा .पहिल्यांदा  देण्यात आल्या त्या मार्ले मिंटो सुधारणा .नंतरचा सुधारणा या माँटेक्स्यु चेस्मफर्ड सुधारणा त्यातील माँंटेक्स्यु हा भारतमंत्री तर चेस्मफर्ड हा व्हाँइसराँय होता .या दोघांनी एकत्रीत केलेला सुधारणेचा मसुदा म्हणजे माँटेक्स्यु चेमस्फर्ड सुधारणा . या नंतर देण्यात आलेल्या सुधारणा म्हणजे सायमन कमिशन .       ...

विश्वासाह्य माध्यमांची व्याख्या

इमेज
                  भारतात घडणाऱ्या काही घडामोंडीवर मी फेसबुकवर भाष्य करणाऱ्या पोस्ट पेस्ट केल्या होत्या .त्यावर  प्रतिक्रिया देताना माझ्या फेसबुकवरील मित्रांनी मला एकांगी माध्यमांपासून दूर जात निष्पक्ष माध्यमांनी केलेल्या बातम्या बघण्याचा सल्ला दिला .त्यांनी मला काही माध्यमांची नावेही सुचवली . माझ्या मित्रांच्या मते निष्पक्षी असणारी माध्यमे मुळात एका विशिष्ठ विचारसरणीची असल्याचे मला आढळले .माझ्या मित्रांचा कल देखील त्या विशिष्ठ विचारसरणीकडे असल्याने त्यांनी त्यास निष्पक्ष असल्याचे प्रमाण पत्र दिले होते .                          माझ्या मित्रांना मी कोणत्या माध्यमाचा बातम्या बघतो, हे सांगितल्यावर त्यांनी ते एकांगी , भारताची प्रगती न बघवणार्या समुहाचे प्रतिनिधीत्व करत असल्याचे सांगितले .  मी बघत असणारी माध्यमे सरकारवर टिका करण्यात आघाडीवर आहेत . त्यामुळे त्यांना एकांगी असल्याचे प्रमाणपत्र त्यांनी दिले होते .                 ...

आगरकरांचा वारसा चालवणारा पत्रकार रविशकुमार

इमेज
सध्याचा माध्यमांवर विश्वासाह्यतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असताना,  ज्याप्रमाणे अत्यंत  मिट्ट काळोखात एखादी मिणमिणती पणती मोठा उजेड देऊन जाते .आज जरी गडद काळोख असला तरी उद्या सोन्याची पहाट  होणार आहे  अशा विश्वास देते असेच एक नाव सध्या माध्यमात गाजते आहे . ते म्हणजे एन दि टी व्ही  या वृत्तवाहिनीवरील कार्यकारी संपादक , ज्येष्ठ  पत्रकार रवीश कुमार . कोणतीही पारिवारिक पाश्वभुमी नसताना बिहारसारख्या भारतातील अत्यंत मागास भागातून नवी दिल्लीत येऊन स्व कष्टातून पत्रकारितेत  स्वतःचे अढळ स्थान निर्माण  करणारा हा पत्रकार . या वर्षीचा आशिया खंडातील नोबेल समजल्या जाणाऱ्या रेमन मॅगसेसे या 6 विविध क्षेत्रात दिल्या जाणाऱ्या  पुरस्कारांपैकी पत्रकारिता या क्षेत्रात दिल्या गेलेल्या  मानकरी . म्हणजे रवीश कुमार .      सत्ताधिकाऱ्यांचा विरोधात कायम आवाज उठवून माध्यमांची जागल्याची भूमिका पार पडणारा पत्रकार इष्ट असेल ते करणारच  , योग्य असेल ते बोलणारच  याची आठवण करून देणारा पत्रकार म्हणजे रवीश कुमार . माझ्या आकलनानुसार दो...

आपण कधी बघणार या प्रश्नांकडे

इमेज
काल दिनांक 14जुलैला टिव्हीवर बिबिसी न्युज बघताना एक माहितीपट बघीतला . माहितीपट भारतातील तृतीयपंथीयांच्या समस्येवर आधारित होता . त्यामध्ये काय सांगितले होते त्याचा उहापोह मी येथे करणार नाही . मला लक्ष वेधून घेयचे आहे . त्यांनी मांडलेल्या विषयावर . बीबीसी प्रमाणेच  आखाती देशातील प्रमुख वृत्तवाहिनी असलेल्या अल् जझीरा  या वृत्तवाहिनीवर मी भारतातील विविध समस्यांचे माहितीपट अनेकदा बघतो . (यावर कोणला  त्यांचा भारतविरोधी धोरणाचा वास येईल) चॅनेल न्यूज  एशिया या सिंगापूरच्या वृत्तवाहिनीवर सुद्धा  भारतातील झटपट सुरु होऊन लवकरच बंद पडणाऱ्या स्टार्टअपविषयी एक माहितीपट मी बघितला होता . मात्र भारतीय वृत्तवाहिन्यांवर मी या प्रकारचे माहितीपट कधीच बघितले नाही . भारतातील सर्व समस्या संपल्या आहेत , असेच काहीसे वार्तांकन भारतीय माध्यमांचे असते .ज्या समस्या अन्य परदेशी माध्यमांना सहजतेने दिसतात . त्या समस्या भारतीय माध्यमांना  का  दिसत नाही                भारतातील वृत्तवाहिन्या मनोरंजनाच्या बातम्या अध...

भारतीय माध्यमे आणि शांघाय कोऑपरेशन

इमेज
            सध्या किरिगिस्ता न या देशात " शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन' या जागतिक संघटनेचे अधिवेशन चालू आहे . आपल्या देशाचे पंतप्रधान मा . नरेंद्र  मोदी या अधिवेशनाला भारताचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित आहेत . या जागतिक अधिवेशनात विविध जागतिक मुद्यांवर चर्चा होणार आहे. ज्यामध्ये संघटनेच्या  सदस्य देशांमध्ये आर्थिक , व्यापारी सामाजिक, सांस्कृतिक , प्रादेशिक शांतता , शास्त्र विषयक  घडामोडी ,बदलते पर्यावरण  राजकीय घडामोडी   आदी घडामोंडीचा समावेश असणार आहे . त्यासाठी विविध देशांचे प्रतिनिधी हजर राहणार आहे . ज्यामध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग सुद्धा असणार आहेत . कोणत्याही जागतिक अधिवेशनात काही द्विस्तरीय पातळीवर चर्चा होतच असतात . त्याच न्यायला अनुसरून भारताचे पंतप्रधान  नरेंद मोदी यांचा  काही राष्टांच्या प्रमुखांशी  चर्चा होणार आहेत . ज्यामध्ये प्रामुख्याने चीन या राष्टाशी आपले नरेंद्र मोदी चर्चा करत आहेत .             ...

हेल्मेट सक्ती च्या नावाने चांगभलं

इमेज
                     सध्या नाशिक शहरामध्ये सर्वत्र हेल्मेट सक्तीची चर्चा जोरदारपणे चालू आहे . हेल्मेट सक्तीचे पुरस्कर्ते हेल्मेटअभावी मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींची संख्या सांगून हेल्मेट किती उपयोगी असे सांगत आहे . मात्र या सक्तीच्या बाजूने बोलणाऱ्या व्यक्ती एका मुद्द्यावर  जाणूनबुजून सांगत नाहीये .                                ते म्हणजे हेल्मेट नसल्यामुळे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींपैकी  किती जणांना त्यांचा अपघात  झाल्यावर सुरवातीच्या २० मिनिटात ज्याला वैद्यकीय भाषेत कृशल अवर म्हणतात , त्या कालावधीत वैद्यकीय उपचार मिळाले होते.        कोणत्याही  अपघातात व्यक्तीला सुरवातीच्या कालावधीत मिळणाऱ्या उपचारांना अनन्यसाधारण महत्व आहे. जर ते योग्य प्रमाणात मिळाले तर कोणतीही व्यक्ती सहजतेने वाचू शकते , जरी त्या व्यक्तीने हेल्मेट घातले नसले तरी . आणि या वीस मिनिटात योग्य ते उपचार न मिळाल्यास हेल्मेट घातलेली  व...