वंदन लोकशाहीराला
त्या व्यक्तीने फक्त दीड दिवस शाळा शिकली मात्र मराठीतील एक वास्तवदर्शी तळागाळातील लोकांचे लोकांच्या व्यथा योग्य प्रकारे मांडणारे लेखक म्हणून ते परिचित आहे . त्यांनी त्यांच्या 49 वर्षाच्या आयुष्यात तब्बल 35 कादंबरी लिहल्या . त्यांनी लिहलेल्या लोकनाट्य आणि कथा संग्रहाचा तसेच काव्यसंग्रहाचा विचार केला त्यांनी लिहलेल्या पुस्तकांची संख्या 45 पर्यंत पोहोचते . त्यांनी लिहलेल्या पुस्तकांवर 7 चित्रपट आलेले आहेत त्यांना जी राजकीय विचारधारा मान्य होती त्या कम्युनिष्ट विचारधारेच्या प्रेमापोटी त्यांनी रशियाला भेट दिली . त्या प्रवासावर आधारित त्यांनी लिहलेले प्रवासवर्णन प्रसिद्ध...