पोस्ट्स

मे २०, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

चीनविरोधी आघाडीच्या बैठकीसाठी मोदी जपानला

इमेज
           भारताचे पंतप्रधान नरेंद मोदी क्वाड च्या बैठकीसाठी  जपानला जाणार आहेत मंगळवार २४ मे रोजी जपानची राजधानी टोकियो या ठिकाणी हि परिषद होणार आहे क्वाड या गटात ऑस्ट्रेलियायचा पुर्नप्रवेश झाल्यावरची ही ऑनलाईन आणो ऑफलाईन दोन्ही पद्धतीचा विचार करता  चौथी  बैठक आहे   याच्या आधी मार्च २०२१ साली झालेली बैठक ऑनलाईन पद्धतीने झाली होती तर त्याच्या आधी २०२० साली झालेली बैठक ऑफलाईन पद्धतीने अमेरिकेच्या नेतृत्वाखाली अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डिस्ट्रिक कोलंबिया (डी सी ) या शहारत झाली होती ,. अमेरिकेच्या नेतृतवाखालील या  गटात भारत जपान ,ऑस्ट्रेलिया  हे सदस्य देश आहे हिंदी महासागर आणि पॅसिफिक महासागराला किनारा असलेल्या देशांच्या प्रदेशात आणणाऱ्या चिनी दादागिरीला आळा घालणे यासाठी हा गट २००७  या वर्षी स्थापन करण्यात आलाहिंदी महासागर आणि पॅसिफिक महासागराला किनारा असलेल्या देशांच्या प्रदेशातील भारत एक प्रमुख राष्ट्र असल्याने या भागाला जागतिक राजकारणाचा विचार करता इंडो पॅसिफिक भाग म्हणतात हा गट स्थापन करण्यासाठी त्यावेळेचे जपानचे पंतप्रधान शिंजो आबे भारताचे पंतप्रधान डॉक्टर मनमोहनसिंग ऑसट्रेलियाचे

वंदन एका दृष्ट्या पंतप्रधानला !

इमेज
            1991 मे 21 ही एक साधीसुधी तारीख नाहीये. आपल्या भारताचे अत्यंत कठीण काळात सक्षम नेतृत्व करणाऱ्या  भारताला एका नव्या उंचीवर घेवून जाण्याची इच्छा असणाऱ्या पंतप्रधान राजीव गांधी यांची निवडणूक प्रचारादरम्यान मानवी बाँम्बस्फोटाद्वारे हत्या झाल्याची ही तारीख होय. आज या तारखेला 31 वर्षे अर्थात जवळपास दोन पिढ्याचा कालावधी पुर्ण झाला आहे. राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना भावपुर्ण आदरांजली.               आपल्या भारतात त्यांची अनेकदा घराण्यामुळे पंतप्रधानपद मिळालेला व्यक्ती अशी संभावना केली जाते त्यांची अशी संभावना करणाऱ्या व्यक्ती मात्र हे विसरतात की   दुसऱ्या महायुद्धानंतर स्वतंत्र झालेल्या तिसऱ्या जगातील बहुतेक सर्व देशातील लोकशाहीमध्ये भूतपूर्व राजेच लोकशाहीमध्ये निवडून आले आहेत किंवा त्यांचा स्वतंत्रलढ्यात मोठे योगदान असणाऱ्या व्यक्तीच पुढे शासनात आल्या . भारतही त्यास अपवाद नाही त्यामुळेच भारतीय स्वतंत्रलढ्यात मोठे योगदान असणाऱ्या नेहरू घराण्याचा वारस असणाऱ्या राजीव गांधींच्या गळ्यात पंतप्रधानपदाची माळ पडणे यात काही वावगे असे काही नाही . जगभरात असेच झाले आहे . भारताबरो