पोस्ट्स

मराठी लेबलसह पोस्ट दाखवत आहे

८० तासाला एक

इमेज
८० तासाला एक हा दर आहे २०२५ मध्ये प्रदर्शित झालेल्या मराठी चित्रपटाचा. गेल्या वर्षी तब्बल ११० मराठी चित्रपट प्रदर्शित झाले.मात्र या ११० चित्रपटांनी किती कमाई केली, याची माहिती घेतली असता समोर येणारे चित्र खुपच विदारक आहे.या मराठी चित्रपटांची एकत्रीत कमाई आहे, फक्त ९९ कोटी रूपये‌. सरासरी एका चित्रपटाची कमाई येते ९० लाख रूपये. सुमारे १० कोटी मराठी भाषिक असलेल्या महाराष्ट्राची राजभाषा असलेल्या मराठीचे हे कटू वास्तव आहे. २०२५ वर्षात प्रदर्शित झालेल्या सर्व मराठी चित्रपटांच्या एकत्रीत कमाईला महाराष्ट्राचा लोकसंख्येने भागले असता समोर येणारे चित्र भीषण हा शब्द हास्यास्पद वाटावा असे आहे.महाराष्ट्रातील जनतेने २०२५ वर्षात  मराठी चित्रपटावर खर्च केलेली रक्कम आहे तब्बल १० रूपये प्रती व्यक्ती. एक कप चहाच्या किंमती एव्हढी रक्कम खर्च करण्याचे मोठे औदार्य महाराष्ट्रातील मराठी जनतेने दाखवले आहे. मराठी चित्रपटांनी यावेळी एकत्रीत मिळवलेल्या कमाईला चित्रपटाच्या संख्येने भागले असता चित्रपटाचे जे सरासरी उत्पन मिळते ते आहे ९०लाख रुपये. पुणे, नाशिक सारख्या शहरांमध्ये ६५० ते १३०० स्...

मुळातून नैसर्गिकशास्त्र शिकवणारे पुस्तक, 'किमयागार'

इमेज
  आपल्याकडे वारंवार मराठी भाषा टिकली पाहिजे,असा घोष लावला जातो. मात्र सध्याचा २१व्या शतकात  भाषा  किती जुनी आहे.तीला अभिजात दर्जा आहे का? यापेक्षा त्या भाषेत किती ज्ञाननिर्मिती होते.यावरच भाषा वाढणार आहे. हा महत्तवाचा मुद्दा मराठी भाषा हितचिंतकांकडुन दुर्लक्षिला जातो. फारच थोड्या व्यक्ती मराठी भाषा ज्ञानवर्धक होण्यासाठी प्रयत्नशील राहतात.या मोजक्या व्यक्तीमध्ये समाविष्ट होणारे नाव म्हणजे 'अच्युत गोडबोले'. आतापर्यत अच्युत गोडबोले यांनी मराठी भाषेत आतापर्यत विविध विषयांवर सविस्तर माहिती देणारी पुस्तके लिहली आहेत.जी सर्वच्या सर्व बेस्ट सेलर ठरली आहेत. त्यातीलच एक असलेले 'किमयागार' हे पुस्तक मी ंनाशिकमधील सर्वात जूने सार्वजनिक वाचनालय असलेल्या 'सावाना'च्या मदतीने वाचले. मनूष्य कोणत्याही जाती,धर्माचा आस्तिक अथवा नास्तिक असो, त्याच्या आयुष्यावर परिणाण करणाऱ्या 'नैसर्गिक शास्त्रांच्या भौतिकशास्त्र (फिजिक्स ),रसायनशास्त्र (केमिस्टी) पृथ्वी विज्ञान (अर्थ सायन्स), जीवशास्त्र (बायोलॉजी) या शाखांची ओळख करून देण्यात आली आहे.                ...

प्रत्येक इतिहासप्रेमींनी संग्रही ठेवावे,असे पुस्तक, 'पेशवेकालीन महाराष्ट्र'

इमेज
आपल्यापैकी अनेकांना शालेय जीवनात इतिहास हा विषय आवडत नाही.कंटाळवाणा वाटतो.याचे महत्त्वाचे कारण तो म्हणजे राजकीय इतिहास असतो. इतिहासात वेळोवेळी राज्य केलेल्या व्यक्तींविषयी, त्यांनी केलेल्या युद्ध, लढाया आणि तह करार यांच्या विषयीची माहिती त्यात दिलेली असते. त्यांनी राज्य केले त्यांची माहिती जाणून आता काय उपयोग?या विचारातून इतिहासाकडे दुर्लक्ष केले जाते. मात्र ही इतिहासाची एक बाजू झाली.त्या राज्यकर्त्यांनी ज्या समाजावर राज्य केले,त्या समाजाचा देखील एक इतिहास असतो. जसे एखाद्या प्रदेशातील राजकर्ते बदलतात, तसे हा इतिहास देखील बदलतो.त्यामुळे एखाद्या प्रदेशाचे संपुर्ण  आकलन होण्यासाठी त्या प्रदेशाचा राजकीय इतिहासाबरोबर सामाजिक इतिहास देखील आवश्यक ठरतो.,आणि तो जर आपलाच प्रदेश असेल तर विचारायलाच नको.आपले पुर्वज कोणत्या स्थितीत राहत होते.त्यांच्यापेक्षा आपण कोणत्या पद्धतीने वेगळे रहात आहोत?हे समजले तर सोन्याहुन पिवळे.आपल्या प्रदेशातील सामाजिक इतिहास समजला तर आपल्याला आपण कोण आहोत,हे सहजतेने समजते आपलीच आपल्याला नवी ओळख होते.आपल्या महाराष्ट्राचा बाबत बोलायचे झाल्यास, आपली ही गरज स...

ज्ञानभाषा मराठी!

इमेज
फेब्रुवारी महिन्याचा शेवटून दुसरा दिवस मराठी भाषा दिन म्हणून साजरा करण्यात येतो, हे जगजाहीर आहे. मराठीतील थोर कवी कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जयंतीचे औचित्य साधत साजरा होणाऱ्या, या दिवशी समाजमाध्यमांमध्ये मराठीची थोरवी गाणाऱ्या, तीला अभिजात भाषेचा दर्जा का आवश्यक आहे ? तसेच मराठी कशी जगातील एक प्रमुख भाषा आहे, मराठी माध्यमातील शाळा टिकवण्यासाठी काय करणे गरजेचे आहे?    मराठी वाढण्यासाठी काय काय केले पाहिजे. हे सांगणाऱ्याविविध पोस्ट आपण दरवर्षी   बघतो .आता मी मराठीतच बोलणार, लिहणार असा संकल्प देखील आपल्यापैकी अनेक जण या निमित्ताने करतात. मात्र दरवर्षी मराठीबाबत ठराविक गोष्टींचीच उजळणी होते,मात्र घोडे काही पुढे जात नाही, असो     ब्रिटीश लोक तंत्रज्ञानात पुढे होते. ज्यामुळे त्यांनी भारतासह जगभरातील विविध सत्ताधिशांचा पराभव केला, आणि संख्येने कमी असून देखील ते तेथील सत्ताधीश झाले. सत्ताधिशांची भाषा म्हणून इंग्रजी जगभर पसरली, परीणामी आज ती जगातील एक सर्वत्र बोलली जाणारी भाषा म्हणून उदयास आली आहे. आपली मराठी नेमकी मार खाते ती इथेच. सर्वसामन्यांना समजेल अस्या मराठ...

दुराग्रह नको.... आग्रह ठीक....!

इमेज
                               जागतिक मराठी दिनाच्या शुभेच्छा देताना एका मराठी अभिनेत्रीने काहीसी अयोग्य वाटावी, असी भाषा वापरली,आणि एका नव्या वादाला तोंड फुटले.ष च्या ऐवजी श वापरणारे किंवा उलटेही वापरणारे तसेच ण आणि न यात गल्लत करणाऱ्यांसह सर्वांना मराठी दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा, असी काहीसा दिनाच्या औचित्याला साजेशी नसणारी टिपण्णी त्या अभिनेत्रीने केली.                   बोलीभाषेत त्या त्या प्रदेशातील जीवनाचे प्रतिनिधित्व दिसत असते.प्रदेशनिहाय परीस्थिती बदलत असल्याने, बोलीभाषा देखील बदलते, अस्या वेळी सर्व प्रदेश्यातील लोकांना समजेल असी भाषा निर्माण करण्यास कोणाचीही हरकत नसावी. मात्र या प्रमाण भाषेचा दुराग्रह करत, बोली भाषांना कचऱ्याची कुंडी दाखवली जाते, तेव्हा मोठा प्रश्न निर्माण होतो, जो त्या अभिनेत्रीच्या टिपण्णीमुळे निर्माण झाला आहे.                व्यक्ती आपण त्याचा मातृभाषेत  सहजतेने व्यक्त होतो असे म्हणतो, तेव...

ज्ञानभाषा मराठी!

इमेज
    फेब्रुवारी महिन्याचा शेवटून दुसरा दिवस मराठी भाषा दिन म्हणून साजरा करण्यात येतो, हे जगजाहीर आहे. मराठीतील थोर कवी कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जयंतीचे औचित्य साधत साजरा होणाऱ्या, या दिवशी समाजमाध्यमांमध्ये मराठीची थोरवी गाणाऱ्या, तीला अभिजात भाषेचा दर्जा का आवश्यक आहे ? तसेच मराठी कशी जगातील एक प्रमुख भाषा आहे, मराठी माध्यमातील शाळा टिकवण्यासाठी काय करणे गरजेचे आहे?   मराठी वाढण्यासाठी काय काय केले पाहिजे. हे सांगणाऱ्याविविध पोस्ट आपण दरवर्षी  बघतो .आता मी मराठीतच बोलणार, लिहणार असा संकल्प देखील आपल्यापैकी अनेक जण या निमित्ताने करतात. मात्र दरवर्षी मराठीबाबत ठराविक गोष्टींचीच उजळणी होते,मात्र घोडे काही पुढे जात नाही, असो     ब्रिटीश लोक तंत्रज्ञानात पुढे होते. ज्यामुळे त्यांनी भारतासह जगभरातील विविध सत्ताधिशांचा पराभव केला, आणि संख्येने कमी असून देखील ते तेथील सत्ताधीश झाले. सत्ताधिशांची भाषा म्हणून इंग्रजी जगभर पसरली, परीणामी आज ती जगातील एक सर्वत्र बोलली जाणारी भाषा म्हणून उदयास आली आहे. आपली मराठी नेमकी मार खाते ती इथेच. सर्वसामन्यांना समजेल अस्या...

मुद्दा योग्यच पण ....

इमेज
       महाराष्ट्र शासनाने  मराठीचा उत्कर्ष व्हावा यासाठी यापुढे सर्व दुकानाच्या पाट्या मराठीत असाव्यात, असा आदेश नुकताच काढला. मराठीचा विकासाबाबतची त्यांची भुमिका अभिनंदनास पात्र आहे मात्र  पुढील    गोष्टींचा देखील विचार करणे आवश्यक  आहे असे  मला वाटते          सध्याचे युग तंत्रज्ञानाचे आहे. या तंत्रज्ञानाच्या युगात ज्या भाषेत तंत्रज्ञान आहे, त्याच भाषेचा विकास होणार, हे जगजाहीर आहे, आणि या बाबत मराठीत प्रचंड अनास्था आहे. वाचलेले सहजतेने समजू शकते, अस्या मराठी भाषेत तंत्रज्ञानाची माहिती अच्युत गोडबोले यांच्या व्यतिरीक्त कोणी दिली आहे का ? याबाबत माहिती घेतल्यास समोर येणारे चित्र निराशाजनक आहे. रोजच्या व्यवहारात इंग्रजी शद्ब वापरले जात असताना संस्कृतप्रचूर शद्ब वापरून विषय समजून घेतल्याने काहीसी अडचण निर्माण होवू शकते. ती अडचण दाखवून त्यापुढचे व्यक्ती ती संकल्पना समजण्यासाठी इंग्रजीचाच आधार घेताना दिसते, त्यामुळे मराठीचा ज्ञानभाषा बनण्याचा मार्ग खुंटतो आज इंग्रजी समजण्यात येणाऱ्या अनेक संकल्पना जसे अल्फा...

एका कप्यात बंद करण्यात आलेले साहित्यिक पु.ल.

इमेज
    8 नोव्हेंबर ही तारीख एका महान मराठी साहित्यीकाची जयंती, म्हणून मराठी सारस्वतात परीचित आहे. पुरषोत्तम लक्ष्मण देशपांडे अर्थात पु. ल. देशपांडे हे त्या साहित्यकाचे नाव. त्यामुळे मराठी साहित्यांवर प्रेम करणाऱ्या सर्व सारस्वतांना मनःपुर्वक शुभेच्छा .      पु.ल. म्हंटले की प्रामुख्याने विनोदी लेखन करणारे साहित्यीक म्हणूनच ओळखले जातात. मात्र त्यांनी फक्त मराठीमध्ये विनोदी साहित्य निर्मितीच केली नाही, तर तीन व्याख्याने, गांधीजी आदी गंभीर लेखन सुद्धा केले आहे. ज्यात त्यांनी अनेक राजकीय , सामाजिक प्रश्नावर ठोस भुमिका घेतली आहे. मात्र पु. ल. आणि आपल्या सर्वांच्या दुर्देवाने पु.ल.देशपांडे यांच्या विनोदी साहित्याला जितकी अमाप प्रसिद्धी लोकप्रियता मिळाली, तितकी समाजमान्यता या लेखनास मिळाली नाही. समाजाने त्यांना कायम विनोदी लेखनाच्या कप्यातच बंदिस्त केले. त्यांच्यावर चित्रीत करण्यात आलेल्या दोन चित्रपटांमध्येही त्यांवर फारसे भाष्य करण्यात आलेले नाही, असे माझे निरीक्षण आहे, असो       पु. ल. देशपांडे यांच्या विनोदावर शहरी सुशिक्षीत वर्गाला आवडतील, अस्या ...

मराठीतील वास्तवदर्शी चित्रपट

इमेज
काही दिवसापुर्वी मी हिंदीतील वास्तवदर्शी चित्रपटाविषयी लिहले होते. त्यावेळेस माझ्या एका वाचकाने हिंदीपेक्षा मराठीत वास्तवदर्शी चित्रपट अधिक असल्याचे माझ्या लक्षात आणून दिले. आणि ते खरेही आहे ना ! मराठीत दहावी फ, सामना, सिंहासन ,सरकारनामा, झेंडा, कायद्याचे बोला, गोष्ट छोटी डोंगराएव्हढी, देवराई, सैराट अस्या एकाहून एक सरस वास्तवदर्शी चित्रपटांनी मराठी चित्रपटश्रुष्टी सजल्याचे आपणास वरवर बघीतले तरी सहजतेने लक्षात येते. स्किझोफेनिया सारखा गंभीर मानसिक आजार, शेतकरी आत्महत्या, राजकारणी आणि बिल्डर यांचे सबंध, सहकारी क्षेत्र , तसेच विधीमंडळातील राजकारण , शैक्षणिक समस्या, जातीय वातावरण, न्यायव्यवस्था  मानवी जीवनातील सर्वच.क्षेत्रांवर मराठीत वास्तवदर्शी  चित्रपट निघाले आहेत. मी वर  उल्लेखलेले चित्रपट हे मुख्य धारेतील चित्रपट आहेत. प्रयोगशील, समांतर धारेतील चित्रपट, तसेच विविध महोत्सवात प्रदर्शीत होणाऱ्या चित्रपटांचा विचार करता , ही संख्या याहून कितीतरी मोठी होइल, हे नक्की. नूकत्याच जाहिर झालेल्या चित्रपट पुरस्काराने यावर सोनेरी मोहरच उमटवली आहे, असे म्हटल्यास वावगे ठरायला नको. मी पु...

मराठी पाउल पडते पुढे !

इमेज
आपल्या भारतात,  महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थेत आरक्षण देणारे पहिले राज्य , समस्त भारतातला रोजगार हमी योजनेची ओळख करून देणारे राज्य , भारताला सहकाराची ओळख करून देणारे राज्य , महिलांना  शिक्षण देण्याची सुरवात करणारे राज्य म्हणून महाराष्ट्राची ओळख आहे . आणि अश्या प्रतगशील विचाराच्या राज्याची राज्यभाषा म्हणून मराठीची ओळख आहे . जगातील 15 कोटी लोकसंख्येची मातृभाषा असणाऱ्या या मराठी भाषेत नवनवीन विषयावरचे , आधुनिक ज्ञान यावे , मराठीची उत्तरोत्तर प्रगती व्हावी , यावर काय करावे?  या बाबत गाठायचा आहे विचारमंथन करणे सोपे व्हावे या उद्देश्याने योजलेला दिन म्हणजे जागतिक मराठी दिन जो 27 फेब्रुवारी रोजी असतो . या दिनानिमित्य समस्त मराठी जनतेला खूप खूप शुभेच्छा .       मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पडून असणे. ग्राहकांना विविध प्रकारची सेवा देणाऱ्या खासगी कंपन्यांचा सेवा मराठी भाषेत न मिळणे. मराठी शाळांकडे विद्यार्थ्यांचा ओघ दिवसोंदिवस रोडावणे. इंग्रजी परवडेल पण मराठी भाषा नको, अश्या प्रकारच्या मराठी भाषेतील सरकारी कागदपत...

साहित्य संमेलन आणि मी !

इमेज
      मराठी भाषा मातृभाषा असणाऱ्या आणि साहित्यावर विशेष परीणाम असणाऱ्या लोकांसाठी विशेष महत्तवाचे असणाऱ्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे94 वे साहित्य संमेलन नाशिकला होण्याचे निश्चित झाले आहे. मार्च 2021मध्ये  जेव्हा  जंगलात वसंत ऋतूमुळे विविध फुले फुलली असतील तेव्हा नाशिकच्या  साहित्य पंढरीत 94 व्या साहित्य संमेलनामुळे मराठी  साहित्याला नवीन धूमारे फुटत असतील.          या साहित्य संमेलनात मराठी साहित्याचा आणि मराठी भाषेच्या विविध समस्येवर चर्चा  आयोजित केल्या जातात. जसे मराठी माध्यमांचा शाळा, वाचनालयाची स्थिती, मराठी भाषेवरील इतर भाषांचे आक्रमण वगैरे , हे आपणास  माहिती असेलच. मात्र या विविध विषयांवर होणाऱ्या चर्चेच्या दरम्यान एका महत्तवाच्या विषयावर फारसे विचारमंथन होताना आपणास दिसत नाही, तो विषय म्हणजे विज्ञान कथांचे मराठी साहित्यविश्वातील स्थान .            डाँ. जयंत नारळीकर यांनी मराठीत नावारुपाला आणलेल्या या साहित्यप्रकारात डाँ. श्रीनिवास आपटे यांनी देखील विपूल लेखन केले. मात्र ड...

असा बालनायक होणे नाही!

इमेज
                 कालचीच गोष्ट आहे. फेसबुकवर सहज पोस्ट बघताना एक पोस्ट दिसली. ज्यामध्ये एका व्यक्तीने पुण्यामध्ये आँफलाईन अथवा आँनलाईन कस्याही पद्धतीने चालेल पण फास्टर फेणेचे अंक मिळतील का ?अशी विचारणा केली होती. ही पोस्ट बघून माझा मनात एक प्रश्न वारंवार मनात येत आहे. तो म्हणजे पुर्वीच्या मराठीत असणारे फास्टर फेणे, बोक्या सातबंडे सारखे बाल नायक परत आपल्या मराठीत होतील का?                       सध्याचा काळातील बालनायक म्हणून ज्यांचा उल्लेख करता येईल, असे डोरेमाँन, निंज्जा हातोरी, शिनच्यन, हे या बालनायकांच्या पासंगालाही पुरणार नाहीत. छोटा भीम या ईतर बालनायकांच्या पेक्षा काहीसा सरस ठरेल, इतकेच. वासरात लंगडी गाय शहाणी, या तत्वामुळे. मात्र पुणे परीसरातील उरळी कांचन, हडपसर आदी भागातील छोटा गुप्तहेर म्हणून म्हणून लहानमोठ्या व्यक्तींवर गारूड घातलेल्या फास्टर फेणेची काही औरच वेगळी.  फास्टर फेणेची कथा पहिल्यांदा येऊन कैक पिढ्या लोटल्या , तरी त्याची मोहिनी अजून देखील आहे . फास्टर फेणेमध्ये वर्णन...

हीच ती का मराठी ?

इमेज
            गेल्या आठवड्याभरापुर्वीची गोष्ट आहे एका मित्राने मला फोन केला होता, नेहमीचे क्षेमकुशल झाल्यावर त्याने तूझ्याकडे अरे ते पुस्तक आहे का ?  असा प्रश्न केला.मित्राने विचारलेले पुस्तक मराठीतील एक नामांकित पुस्तक होते. तेव्हापासून एक प्रश्न मला सातत्याने मनात येत आहे, की आपल्या मराठीत अनेक उत्तमोत्तम साहित्यकृती आहेत, ज्यावर अनेक दिर्घ कालावधीच्या मालिका सहजतेने तयार होवू शकतात, ज्या लहानमुलांसह प्रौढ व्यक्तीही सहजतेने बघू शकतील अस्या असताना अत्यंत कटकारस्थांनी भरलेल्या, विविध प्रकारचे गुन्हे सहजतेने दाखवणाऱ्या मालिका मराठीत का बनत आहेत.                जे मालिकांचे तेच विनोदी कार्यक्रमाचे आपल्या मराठीत चि.वि जोशी, पु.ल. देशपांडे, व. पू. काळे, यांच्या सारखे सकस विनोदी लेखन करणारे साहित्य असताना महिलांचे कपडे पुरूषांनी घालणे, आणि विनोद निर्मिती करणे , यात काय हशील? एकेकाळी वाईटपणाचा शिक्का बसलेल्या तमास्यात या प्रकारचे विनोद असतात.आणि ते सादर करण्यास नाच्या म्हणतात ,जो मानाच्या दृष्टीने अत्यंत कमी असतो. आपल्या...

कथा सोन्याचा व्यवसायाची

इमेज
    आपल्याकडे गुरु पुष्पामृत योग, दसरा,लग्न आदी प्रसंगी सोने खरेदीची प्रथा आहे. काही लोक दागिन्यांसाठी तर काही लोक एक सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे बघतात .  मात्र या व्यवसायात गुंतलेल्या व्यक्तींचे जीवन कसे असते ? सोन्याचे दागिने तयार करणारे  सुवर्णकार आणि सोने विकणारे सराफ यांचा खेरीज अन्य कोणते घटक या व्यवहाराशी संबंधित असतात . त्यांचे जीवन कसे असते ? सोन्याकडे एक गुंतवणूक म्हणून बघावे की दागिने करण्याचा एक धातू म्हणून बघावे ? सोने कसे खरेदी करावे?,  ज्यामुळे ते मोडताना घट येणार नाही सध्याची या व्यवसायाची परिस्थिती कशी आहे ? सोन्याच्या व्यवसायातील  सध्याच्या  अडचणी काय आहेत . दागिने कसे तयार करतात . सोन्यातील भेसळ कशी ओळखावी ?  सोन्याविषयी  कोणते विविध कायदे होते आणि सध्या आहेत ? सराफ आणि सुवर्णकारांनी आपल्या उद्योगाच्या रक्षणासाठी आंदोलने केली का ? त्याची फलनिश्चिती काय झाली ? आदी अनेक प्रश्नाची सहजसोप्या ओघवत्या  मराठी भाषेत माहिती देणारी अत्यंत मोजकी पुस्तके मराठीत आहेत . आणि या मोजक्या पुस्तकांम...

वाढदिवस एका मराठी म्हणीचा

इमेज
  आपल्या मराठीला म्हणी वाक्यप्रचार यांचा प्रचंड साठा लाभलेला आहे . यातील काही म्हणी, या लोकांच्या अनुभवातून, समाजाच्या चालीरितीतून जन्माला आलेल्या आहेत . तर काही म्हणी, वाक्यप्रचारांचा उदय होण्यामागे एखादी ऐताहासिक घटना कारणीभूत आहे. जसे पानिपतच्या तिसऱ्या युद्धातील हानीमुळे सर्वश्व नाहीसे होणे यासाठी उदयास आलेली पानिपत होणे ही म्हण अथवा खुप मोठा पराक्रम केल्यास त्याचे वर्णन करायला वापरली जाणारी अटकेपार झेंडा रोवणे ही म्हण  .                1758साली आँगस्ट महिन्याच्या दहाव्या तारखेला झालेल्या अटकेच्या विजयाच्या  घटनेमुळे समस्त भारतीयांना आणि अफगाणिस्तानातील 1989पर्यत (युनाटेड सेव्हीयत  सोशालिस्ट रशियाने आक्रमण करण्यापर्यत) सत्ताधिश असणाऱ्या  सत्ताधिशांना मराठी सत्ता काय चीज आहे हे समजले. येत्या सोमवारी अर्थात 10आँगस्ट 2020रोजी या घटनेला तब्बल 262 वर्षे पुर्ण होत आहे .त्या निमित्ताने समस्त मराठी भाषिक जनतेला वंदन .                 सन 1962रोजी चीनने भारतावर आक्रमण केल्यावर महाराष्ट्रीय...

मराठीचे त्रांगडे

इमेज
        मला दोन एक दिवसापुर्वी जो मुळात मराठी भाषिक आहे, मात्र जो आता मराठीमध्ये न लिहता इंग्रजी भाषेत विज्ञान, भारताचे परराष्ट्र धोरण आदी विषयावर लेखन करतो,  अशी व्वक्ती भेटली. मला तो ज्या विषयावर लेखन करतो , त्या विषयावर मराठीत फारच कमी लेखन दिसत असल्याने आणि तो मुळात मराठी भाषिक असल्याने मी त्यास मराठीत या विषयावर का लेखन करीत नाहीस ? मराठीत लेखन केल्यास सर्वसामान्य, ग्रामीण जनतेस समजेल असे विचारल्यावर त्याने उपस्थित केलेले मुद्दे आपणापर्यत पोहचवण्यासाठी आजचे लेखन .त्याने दोन मुद्द्याला स्पर्श केला, पहिला प्रमाण मराठी आणि दुसरा मराठीतील शुद्धलेखनाचा अतिरेक .               त्याचा अनुभवानुसार  मराठी या विषयावर जास्त लेखन  न येण्यामागे एक महत्त्वाचे कारण म्हणजे, एका ठराविक प्रदेशातील काही ठराविक व्यक्ती समुहात बोलल्या जाणाऱ्या भाषेला  प्रमाण भाषा म्हणून दिलेली मान्यता. सगळ्या मराठी भाषिक जनतेचा विचार करता ही संख्या अत्यंत तूटपुंजी आहे .मात्र त्यांची भाषा ही प्रमाणभाषा म्हणून इतरांवर लादण्यात आल्याने मराठी ही ज्ञा...

ओळख एका वन कथा संग्रहाची

इमेज
              मारुती चितमपल्ली....... पेशाने वनखात्यात वरिष्ठ पदावर कार्यरत असणारे मराठीतील नामवंत साहित्यिक . अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी संमेलनाध्याक्ष . जंगले आणि त्यातील समाजजवीन तसेच  प्राणीजीवनावर आधारित साहित्य जगविख्यात आहेत . त्यांच्या \प्रसिद्ध असणाऱ्या साहित्यामध्ये "केशराचा पाऊस " या कथासंग्रहाचा बराच वरचा क्रमांक लागतो . सध्याच्या लोकडाऊनच्या काळात मी ते पुस्तक   नुकतेच वाचले .                           पुस्तकात त्यांच्या नोकरीच्या कार्यकाळाळतील आठवणी कथारूपाने सांगण्यात आलेल्या आहेत . पुस्तकात 16कथा असून पहिल्या दोन कथांमध्ये अनेक प्रकरणे आहेत .  पुस्तकाची भाषा संवादी असल्याने पुस्तक जरी माहितीविषयी असले तरी पुस्तक वाचणे कंटाळवाणे न होता ज्याला  ज्ञानवर्धक (  INFOTAINMENT ) म्हणता येईल असे झाले आहे .सदर पुस्तकामध्ये त्यांनी स्वतःचा उल्लेख माधव असा केला असून . या कथासंग्रहातील कथांमध्ये सुरवातीच्या 9 कथांमध्ये नायका बरोबर त्याची नायिक...

ओळख एका रत्नाची

इमेज
                                आपल्या भारतीय चित्रपटसृष्टीत अनेक अभिनेत्री आपल्या अभिनयामुळे नावारूपास  आलेल्या आहेत ,  वहिदा   रेहमान त्यापैकीच एक  मूळच्या  तेलगू भाषिक  असणाऱ्या या मुस्लिम  धर्मीय अभिनेत्रीने आपल्या सहज सध्या अभिनयाने हिंदी चित्रपट सृष्टीत एक काळ गाजवून टाकला . गाईड , प्यासा सारखे  अनेक लोकप्रिय चित्रपट त्यांनी आपल्या कारकिर्दीत दिले . सुरवातीच्या काळात तेलगू भाषेतील चित्रपट केलेल्या या अभिनेत्रीने अनेक पत्रकारांना प्रदीर्घ मुलाखती दिल्या आहेत .त्यापैकीच एक म्हणजे नसरीन मुन्नी कबीर  यांना. वहिदा रेहमान यांनी दिलेली मुलाखत ..नसरीन मुन्नी कबीर  यांना दिलेली प्रदीर्घ मुलाखत पुस्तक रुपाने प्रसिद्ध करण्यात आली आहे . मुळची इंग्रजीत असलेल्या या प्रदीर्घ मुलाखतीचे मराठीतील ज्येष्ठ सिने पत्रकार, आणि आघाडीचे अनुवादक मिलींद चंपानेरकर यांनी अनुवादित केलेले पुस्तक रोहन प्रकाशनामार्फत प्रकाशीत करण्यात आले आहे.        ...