पोस्ट्स

जानेवारी १२, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मकर संक्रातीच्या निमित्याने ! (भाग 1)

इमेज
     14 जानेवारी रोजी मकर संक्रांत हा सण आहे. सुर्याचे उत्तरायण आणि  मकर राशीत भासमान भ्रमण सुरु होण्याचा निमित्ताने हा सण साजरा करण्यात येतो. सुमारे हजार वर्षांपूर्वी सुर्याचा मकर राशीत प्रवेश होताना  उत्तरायण सुरु होत असे. मात्र पृथ्वीचा परांचन गतीमुळे यात फरक पडला आहे. सध्या 22 डिसेंबर रोजी उत्तरायणास सुरवात होते.  तर दर 70 वर्षांनी मकर संक्रातीचा एक दिवस पुढे जातो. स्वामी विवेकानंद यांच्या जन्माचा वेळी 12 जानेवारीला मकर संक्रांत हा सण येत असे, आता हा सण 14 किंवा 15 जानेवारीला येतो. हा फरक का पडतो?  हे सांगण्यासाठी आजचे लेखन .सुर्य अथवा इतर ग्रह एखाद्या राशीत जातो, म्हणजे काय ?(माझी माहिती खगोलशास्त्राच्या दृष्टीने असेल,ज्योतिषशास्त्रानुसार नसेल याची नोंद घ्यावी) माहिती मी याच लेखाच्या पुढील भागात देईल. तर  बघूया मकर संक्रांती आणि उत्तररायण यांचा सबंध उलगडणारी माहिती.         मित्रांनो, पृथ्वी स्वतःभोवती फिरते, त्यास परीभ्रमण म्हणतात ,तर सुर्याभोवती फिरते, त्यास परीवलन म्हणतात. हे आपणास माहिती असेलच. याशिवाय पृथ्वीला अजून एक गती आहे, परांचन गती, नावाची. या गतीमुळे हे नाट्य घडते. आण