पोस्ट्स

जुलै २८, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पाकव्याप्त काश्मीरमधील निवडणूका आणि आपण! (भाग2)

इमेज
         नुकत्याच पाकिस्तान अनधिकृतपणे आपल्या ताब्यात असलेल्या पाकव्याप्त काश्मीरच्या दक्षीणेचा भागात ज्याला ते आझाद काश्मीर म्हणतात तेथील विधानसभेच्या निवडणूका झाल्या. ज्यामध्ये पाकिस्तानात सध्या केंद्रीय सत्तेसह सिंध वगळता सर्व विधानसभेत सत्तेत असणाऱ्या पाकिस्तान तेहरीके इंसाफ या पक्षाला बहुमत मिळाले.  निवडून येणाऱ्या 45 सदस्यांमध्ये पाकिस्तान तेहरीके इंसाफ या पक्षाला 25 जागा मिळाल्या .(या विधानसभेची रचना मी आधीच्या भागात सांगितली आहेच) पाकिस्तान पिपल्स पार्टीला 11 तर सत्ताधिकारी पाकिस्तान मुस्लिम लीग (नूर) ला 6 जागा मिळाल्या.       या निवडणूकांमध्ये लष्कराच्या मदतीने केंद्रीय सत्तेने गैरप्रकार केल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. यावर केंंद्रीय सत्तेपेक्षा प्रांतिक सत्ता अधिक मोठ्या प्रमाणात गैर प्रकार करु शकते.मात्र त्यांनी काहीच विकास त्यांचा कार्यकाळात न केल्याने लोकांनी आम्हाला सत्तेत बसवले असे उत्तर पाकिस्तान तेहरीके इंसाफ या पक्षाने दिले आहे.               पाकिस्तानच्या सध्याचा सविधानानुसार (1947 नंतर पाकिस्तानमधील संविधान निर्मिती हा मोठा विनोद आहे. त्यांचे पहिले संविधान