पोस्ट्स

मार्च २३, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

अंधरातून अधिक गहिऱ्या अंधराकडे

इमेज
    एखाद्याचे दिवस फिरले की, एखादेच संकट येण्याऐवजी, त्यांची मालिकाच सुरु होते. आपल्या भारताच्या दक्षीणेकडील डोळ्यातील अश्रूच्या आकारातील श्रीलंका या देशातील नागरीक सध्या अस्याच घडामोडींचा अनुभव घेत आहेत. आशिया खंडातील पहिले रेडीओ केंद्र ज्या श्रीलंकेत उभारले तो देश मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. दिवसोंदिवस हे संकट अधिकच गंभीर होत चालले आहे.       बुधवार 23मार्च रोजी श्रीलंकेत पेट्रोल मिळण्यासाठी रांगेत उभ्या असलेल्या 4 श्रीलंकन व्यक्तींचा उष्माघातामुळे आणि पेट्रोल मिळवण्यासाठी झालेल्या धक्काबुक्कीत मृत्यू झाला. या घटनेमुळे तेथील आर्थिक स्थिती किती विदारक आहे? , हे आपण समजू शकतो.उष्माघात कोणत्याही कारणाने होवू शकत असल्याने, एकवेळ उष्माघाताने झालेले मृत्यू क्षम्य करता येईल.मात्र पेट्रोल मिळवण्यासाठी झालेल्या धक्काबुक्कीत झालेले मृत्यू अक्षम्यच आहे. नागरीकांना पेट्रोल भरण्यासाठी अडचण येवू नये यासाठी श्रीलंकन सरकारने पेट्रोल पंपावर लष्कर तैनात केले आहे. गेल्या काही दिवसात श्रीलंकेतील पेट्रोलचे आणि डिझेलचे भाव 25%वाढले आहेत. पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढल्याने वाहतूकीच्या खर्च्यात वाढ होव