पोस्ट्स

ऑगस्ट ७, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

विश्वासाह्य माध्यमांची व्याख्या

इमेज
                  भारतात घडणाऱ्या काही घडामोंडीवर मी फेसबुकवर भाष्य करणाऱ्या पोस्ट पेस्ट केल्या होत्या .त्यावर  प्रतिक्रिया देताना माझ्या फेसबुकवरील मित्रांनी मला एकांगी माध्यमांपासून दूर जात निष्पक्ष माध्यमांनी केलेल्या बातम्या बघण्याचा सल्ला दिला .त्यांनी मला काही माध्यमांची नावेही सुचवली . माझ्या मित्रांच्या मते निष्पक्षी असणारी माध्यमे मुळात एका विशिष्ठ विचारसरणीची असल्याचे मला आढळले .माझ्या मित्रांचा कल देखील त्या विशिष्ठ विचारसरणीकडे असल्याने त्यांनी त्यास निष्पक्ष असल्याचे प्रमाण पत्र दिले होते .                          माझ्या मित्रांना मी कोणत्या माध्यमाचा बातम्या बघतो, हे सांगितल्यावर त्यांनी ते एकांगी , भारताची प्रगती न बघवणार्या समुहाचे प्रतिनिधीत्व करत असल्याचे सांगितले .  मी बघत असणारी माध्यमे सरकारवर टिका करण्यात आघाडीवर आहेत . त्यामुळे त्यांना एकांगी असल्याचे प्रमाणपत्र त्यांनी दिले होते .                       गेल्या काही दिवसांपासून माध्यमांच्या निष्पक्षपणावर सातत्याने बोलले जात आहे . माध्यमे एकांगी झाल्याचा आरोप त्यांच्यावर केला जातोय . माध्यमांचे मालक विविध