पोस्ट्स

ऑगस्ट २२, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया

इमेज
  इंडोनेशिया देशातील मंदिरातील गणपती                         सर्वप्रथम सर्वांना  गणेशॊच्छवाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.  सध्या आपण सर्व मराठी भाषिक गणेशॊच्छवच्या रंगात रंगून गेलो आहोत. मित्रानो बुद्धीची देवता असणारी , कोणत्याही पूजेच्या वेळी अग्रपूजेचा मान असणारी, गणाचा अधिपती असणाऱ्या गणपती ही देवता फक्त आपल्या महाराष्ट्रात किंवा भारतातच पुजली जाते, असे आपणास वाटतं असेल तर आपण चुकलात  ,भारताबरोबर भारत आणि चीन या प्राचीन संस्कृतीचा एकत्रित प्रभाव आढळणाऱ्या आग्नेय आशियातील अनेक देशात गणपती पुजला जातो . आपल्या महाराष्ट्रातील गणपतीच्या साडेतीन पिठाची आणि  वैदर्भीय अष्टगणेशाची माहिती आपण माझ्या या आधीच्या लेखातून घेतली आहेच . ज्यांना ती वाचायची असेल त्यांनी या लेखाच्या खाली दिलेल्या लिंकवर क्लीक करावे . माझे  आजचे लेखन आग्येय आशियातील गणपतीची माहिती देण्यासाठी   .    व्हिएतनाम मध्ये शिवलिंग , विष्णू , दुर्गा , कार्तिकेय , गणपती त्याचप्रमाणे बुद्ध , बोधिसत्व यांच्या प्रतिमा आढळल्या आहेत. व्हिएतनाममधील ‘ मी सोन ’ ( स्थानिक भाषेतील याचा अर्थ सुंदर पर्वत असा होतो) या ठिकाणी सातव्या शतकातील शिवालया