पोस्ट्स

जून १६, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

माझे पहिले भाषणाची हकिकत भाग 2

इमेज
           वक्तृत्व ही एक कला आहे . याचा अनुभव मी नुकताच घेतला . त्या मागची पाश्वभुमी मी या आधीच सांगितली आहे . जर तूम्हाला त्याचे वाचन करायचे असल्यास लेखाचा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करावे .       जो सतत वाचतो , तो कालांतराने खुप छान लिहुही शकतो, मात्र माझ्या मते हा न्याय  वक्तृत्वास लावता येणे अशक्यप्राय आहे .जो सतत अन्य वक्त्यांचे वक्तृत्व ऐकतो ,तो छान बोलूच शकेल असे नाही . मीही अनेक भाषणे ऐकतो , म्हणून मी छान बोलू शकतो , असे म्हणणे धाडसाचे ठरेल .किमान माझा पहिला अनुभव तरी हेच सांगत आहे .      वक्तृत्व ही कला आहे, त्याचे शास्त्रोक्त प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे असे माझे मत आहे . शब्दांची गती, तयार भाषणात समोरच्या रसिकांचा मुड बघून यथायोग्य बदल करणे . ते बदल  आहेत, हे श्रोत्यांच्या लक्षात न येवू देणे .             उपस्थित मान्यवरांचा यथोचित उल्लेख करणे . प्रासंगिक विनोदाला , आधीच्या  वक्त्याच्या संदर्भ आपल्या आधीच तयार केलेल्या भाषणात जोडणे . जर ठरलेल्या वेळेपेक्षा कमी वेळ आयत्या वेळी उपलब्ध झाल्यास भाषणाचा यथायोग्य शेवट करणे .तसेच भाषणाच्या ठिकाणी आयत्यावेळी समोर उभ्या ठाकण

सिहासनची चाळीशी

इमेज
               चित्रपट हे समाजावर फार मोठा प्रभाव टाकणारे माध्यम आहे .मात्र याचा विचार फारच थोडे सिने निर्माते  करतात , असे सर्वसाधारण चित्र आहे . जे निर्माते याचा विचार करतात , त्यांनी निर्माण केलेले चित्रपट कालातीत ठरतात . जसे जुने सिने निर्माते गुरुदत्त . आपल्या मराठीत हा मान  द्यायचा झाल्यास निसंकोच तो मान  जब्बार पटेल याना द्यावा लागेल . त्यांनी निर्माण केलेला सिहासन हा चित्रपट निर्मण होऊन आज चाळीस वर्षे होत आली , तरी साध्याचाच चित्रपट बघत आहोत , असे वाटते. इतकी त्याची कथासूत्र सरस आहे , आणि त्याची बांधणी सुद्धा सरसच आहे . याचा प्रत्यय आपणास पहिल्या क्षणापासून येतो .                       चित्रपटाचा पहिल्या फ्रेम मध्येच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस याचा लॉंग शॉट जवळ जवळ येते दिग्गु(निळू फुले ) या व्यक्तिरेखेवर स्थिरावतो . नंतर त्याचा प्रवास चित्रित करत चित्रपट सुरु होतो .एखाद्या सर्वोत्त्कृष्ट कथेला तितकीच साजेशी पटकथा कशी असावी , याचे यासारखे  उदाहरण खचितच सापडेल . लॉंग शॉट चा वापर या चित्रपटात अत्यंत खुबीने करण्यात आला आहे . मग तो चित्रपटाचाच्या शेवटच्या काही भागात फिरणा