पोस्ट्स

नोव्हेंबर ११, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पुनश्च सिंहासन

इमेज
          ऐंशीच्या दशकातील एक उत्कृष्ट मराठी चित्रपट म्हणून, ज्येष्ठ सिने निर्माते जब्बार पटेल यांनी दिग्ददर्शित केलेला सिंहासन ओळखला जातो. अनैतिक व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींचा राजकरण्यासी असणारा सबंध तसेच सामान्य जनतेच्या प्रश्नांपासून कैक दुर अस्या मुद्यांवर राजकारण कसे खेळले जाते? ते त्यात सांगण्यात आले आहे.  मुंबई दिनांक आणि सिंहासन या दोन कांदबरीच्या संयोगातून तयार झालेल्या आणि अनेक  मातब्बर सिने कलावंत असणाऱ्या या चित्रपटाचा दुसरा अंक सध्या सुरु झाला आहे का ? असे वाटावे असे वातावरण सध्या महाराष्ट्रात सुरु आहे. चित्रपटात स्मगर्लस चा राजकारण्यासी असणारा सबंध दाखवण्यात आला आहे. तर सध्या अमली पदार्थाचा पुरवठा करणाऱ्या व्यक्तींचा राजकरण्यासी असणारा सबंधावरून राजकारण तापत आहे. चित्रपटात सामन्य जनतेच्या प्रश्नाला बगल देत सरकार पाडण्याचा विरोधकांचा, आणि त्यांची बाजू त्यांच्यावरच उलटवण्याचा मुख्यमंत्र्यांचा यशस्वी प्रयोग दाखवण्यात आला आहे. आता देखील जनतेच्या प्रश्नांवरुन सरकारला प्रश्न विचारण्याऐवजी सरकारमधील मंत्र्यांचा वर्तनावरुन सरकारला पाडण्याचे विरोधकांचे प्रयत्न सुरु असल्याचे आपणास द