पोस्ट्स

जुलै १२, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

भयानक वास्तवाकडे वाटचाल(भाग3)

इमेज
   सध्या आपल्या महाराष्ट्रात काही जिल्ह्यात कमी पावसामुळे चिंता निर्माण केली असताना जगात सुद्धा एक मोठी चिंता निर्माण होत आहे. ती चिंता आहे अफगाणिस्तानातील तालीबानचा वाढता प्रभाव. गेल्या आठवड्यापासून याबाबत 3 प्रमुख घडामोडी घडल्या. ज्यातील दोन भारताशी प्रत्यक्ष संबधीत आहेत, तर एक अप्रत्यक्ष संबधीत आहे. या सर्व घडामोडी एक जागरुक नागरीक आपणास माहिती असणे आवश्यक आहे. चला तर जाणून घेवूया या घडामोडी . तर अफगाणिस्तानातील भारताचा कान्सुलेट बंद करणार नाहीत असे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून जाहिर होवून तीन ते चार दिवस होत नाही तोच रविवार11 जूलै रोजी सायंकाळी अफगाणिस्तानमधील भारताच्या कंदहार कान्सुलेटमधून 50 भारतीयांना माघारी बोलवल्याचे भारतीय परराष्ट्र मंत्रालयाकडून जाहिर करण्यात आले.【 एखाद्या दूसऱ्या देशात आपल्या देशाचे पुर्ण अधिकार असलेले  राजनैतिक कार्यालय  असल्यास त्यास एँबसी म्हणतात. त्या ठिकाणी अँबेसिडर  हा अधिकारी असतो. याठिकाणी आपल्या देशात जाण्यासाठी लोकांना व्हिसा देणे ,आपल्या देशातील नागरीकांना मदत केंद्रे उभारणे तसेच अन्य परराष्ट्र संदर्भात कार्ये होतात. याचे छोटे स्वरुप म्हणजे