पोस्ट्स

मे १३, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

चोराच्या उलट्या बोंबा !

इमेज
सध्या आपल्या महाराष्ट्रात वाढत कोरोना संसर्गामुळे आणि लसीकरणामुळे वातावरण तप्त असताना, जगाचा विचार करता इस्राइल आणि पँलेस्टाइन यातील संघर्षाने  जगाची झोप उडवली आहे. या संघर्षाचे तात्कालीन कारण आपणास आतापर्यत माहिती झालेच असेल. माझा या लेखाद्वारे याचा इतिहास आपणापर्यत पोहोचवण्याचा उद्देश आहे. तर 19 व्या शतकाच्या उतरार्धात युरोपात राष्ट्रवादाची भावना प्रबळ होती. या राष्ट्रवादाच्या प्रबळ विचारधारेत तो पर्यत स्वतंत्र्य असलेली जर्मन भाषिक राज्ये एकत्र येवून जर्मन हा देश तयार होणे फ्रेंच भाषिक प्रदेश एकत्र फ्रान्स हा देश उदयास येण्यासारख्या घटना घडल्या. त्याच मालिकेत ज्यू धर्मियांची मूळ भूमी ज्यातून त्यांना काही हजारो वर्षापूर्वी निर्वासीत केले होते, त्या पँलेस्टाइनच्या भूमीत ज्यू धर्मियांसाठी स्वतंत्र्य इस्राइलची स्वप्ने काही ज्यू धर्मियांना पडू लागली. मात्र त्यांचे प्रमाण कमी होते. याला मोठ्या प्रमाणात धूमारे फुटले ते पहिल्या महायुद्धाच्या अखेरीस 1917 साली स्वतःच्या ताब्यात असणाऱ्या या प्रदेशात युनाटेड किंग्डम या देशाने या ठिकाणी लवकरात लवकर ज्यू धर्मियांसाठी स्वतंत्र्य राष्ट्र उभारण्याचे