पोस्ट्स

जुलै १३, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

भारतीय रेल्वेची पर्यावरण रक्षणाकडे वाटचाल

इमेज
            गेल्या पंधरवाड्यात भारतीय रेल्वेने दोन मोठ्या गोष्टी केल्या, त्यातील एक गोष्ट ही  कमी खर्चात अधिक मालवाहतूक क्षमता  विकसीत करण्याबाबत केलेली चाचणी होती . ज्यामध्ये तब्ब्ल अडीच किलोमीटर लांबीची रेल्वे भारतीय रेल्वेकडून चालवण्यात येऊन एक जागतिक विक्रम प्रस्थापित करण्यात आला  तर दुसरी गोष्ट सध्याचा सर्वात ज्वलंत विषय असणाऱ्या पर्यावरणाचे रक्षण या बाबतीत उचललेले सकारात्मक पाऊल होते .                सध्या रेल्वेकडून   वर्तमानातील  समस्त मानवापुढील अस्तित्वाचा प्रश्न असलेल्या पर्यावरणाचे  रक्षण या प्रश्नांबाबत जागरूक होत  पृथ्वीचे तापमान वाढवणाऱ्या हरित वायूचें वातावरणातील   प्रमाण कमी करण्याचा हेतूने  आपला डिझेल वापर कमीत कमी करण्याचा मोठ्या प्रमाणात हालचाली करण्यात येत आहेत  . त्याच मालिकेतील समाविष्ट होऊ शकणारी गोष्ट म्हणजेच ही सकारात्मक  गोष्ट होती .  या गोष्टींमध्ये दोन बाबी अंर्तभूत होत्या . पहिली बाब म्हणजे रेल्वेच्या जबलपूरमंडला मार्फत इलेट्रीक आणि बॅटरी या दोन्ही ऊर्जासंसाधनावर कार्यरत राहू शकणाऱ्या रेल्वे इंजिनची निर्मिती ही होती तर  दुसरी बाब म्हणजे  रेल्वे प्रश