पोस्ट्स

डिसेंबर ६, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

दर 44 मिनीटांनी एक!

इमेज
        दर 44 मिनीटांनी एक हा दर आहे 2022मधील विद्यार्थी आत्महत्येचा .4 डिसेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात नॅशनल क्राईम रिपोर्ट ब्युरोच्या अहवालातून ही आकडेवारी जगासमोर आली.या अहवालानुसार 2022साली 12,000 विद्यार्थ्यांनी आपले जीवन संपवले. दर दिवशी 33 तर दर 44मिनीटांनी एक आत्महत्या इतका हा दर भयावह आहे. आपल्याकडे एक टी 20 क्रिकेट मॅच ही साडेतीन तास चालते. या हिशोबाने बोलायचे झाल्यास एका मॅच दरम्यान पाच विद्यार्थ्यांनी आपले जीवन संपवले असते.      काही वर्षांपूर्वी आलेल्या थ्री इडियटस् या चित्रपटाद्वारे या गंभीर विषयाला हात घातला गेला होता. त्यावेळी त्यावर काही प्रमाणात चर्चा देखील झाली होती.मात्र कालांतराने सर्व काही थंड झाले‌.त्यावेळी हा गंभीर प्रश्न  सोडविण्यासाठी सुचवण्यात आलेल्या उपाययोजना या सोईस्करपणे गुंडाळण्यात आल्या. ज्याचा परिणामस्वरूप विद्यार्थ्यांचा आत्महत्येचा आलेख चढताच राहीला. विद्यार्थ्यांमधील ताणतणाव कमी करण्यासाठी सरकारकडून काही प्रयत्न मात्र करण्यात आले.ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा परीक्षा पे चर्चा ,टेलीफोन हेल्पलाईन सेवा आदि गोष्टींचा अंतर्भाव करावा लागेल.मात्र य