पोस्ट्स

एप्रिल ४, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

बातम्यांमधील चीन (भाग 5)

इमेज
  मी आपणासी बोलत असताना, आजमितीस आपल्या भारताचा अशांत प्रदेश म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या , ज्या भागासाठी आपल्या संविधानात 6वे परीशिष्ठ अंतर्भुत करण्यात आले त्या इशान्य भारतातील मणीपुर, मिझोराम, नागालँड या राज्यांबरोबर सीमा शेअर करणाऱ्या म्यानमार या देशात सध्या राजकीय अस्थिरतेने , आंदोलकांनी कळस गाठला आहे. ज्यामुळे या देशाची फाळणी होते की काय ?अशी स्थिती निर्माण झाली आहे. या अराजकतेची सुरवात ज्या लष्करी उठावापासून झाली, त्याला चीनचा पाठिंबा आहे, असी तेथील जनसामन्याची भावना आहे. त्यामुळे चीनविरोधी भावना तीव्र आहे. चीनने हा म्यानमारचा अंतर्गत प्नश्न आहे, आमच्या या बाबीसी काहीसी सबंध नाही, असे जाहिर केले आहे. चीनला इंधनपुरवठा करण्यासाठी इंधनवाहक पाइपलाइन  या देशातून जातात. या देशातील आंदोलकांनी या पाइपलाइन तोडून चीनचा इंधन पुरवठा तोडून टाकण्याची भाषा केली आहे. जर आमच्या दैन्यावस्थेला जवाबदार असणारा लष्करी उठाव आमच्या देशातील अंतर्गत गोष्ट असेल तर आम्ही तोडलेल्या पाइपलाइनसुद्धा आमचा अंतर्गत मुद्दा म्हणायला हवा, असे या आंदोलकांचे म्हणणे आहे. आपल्या देशाला इंधनपुरवठा  करणाऱ्या पाइपलाइनल आंदोलक ख