पोस्ट्स

ऑक्टोबर ६, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

अल्पसंख्यांकांचे हाल दाखवणारी कांदबरी लज्जा

इमेज
अल्पसंख्याकवाद आणि बहुसंख्यांकवादाचे राजकारण लोकांचे आयुष्य किती मोठ्या प्रमाणात उद्धवस्त करते ? यावर अनेक पुस्तके देखील प्रसिद्ध झालेली आहेत. त्यापैकीच एक म्हणजे मुळच्या बांगलादेशी मात्र सध्या कलकत्त्यात वास्तव्यास असणाऱ्या तस्लिमा नसरीन यांनी लिहलेली लज्जा ही कांदबरी . जी माझ्याकडे अनेक दिवस पडुन होती. स्वतः च्या वैयक्तिक संग्राहात असून देखील काही कारणाने वाचली नव्हती .जी मी नुकतीच वाचली. कांदबरीत दंगलीचे वर्णन अंगावर काटे उभे करते. एखादा उन्माद कसे व्यक्तींची राखरांगोळी करतो. लोकांच्या भावना कस्या प्रकारे पेटवून राजकारणी व्यक्ती त्यांचे राजकरण खेळतात. राजकारणी व्यक्तींच्या या खेळामुळे सर्वसामान्य व्यक्ती त्यातही समाजात अल्पसंख्याक असलेला समाजघटक कसा भरडला जातो याचे दाहक वर्णन यामध्ये आहे.  कोणत्याही प्रकारची कट्टरता कशी वाईटच असते हे दाखवण्याचे  उत्कृष्ट उदाहरण म्हणजे ही सुमारे पावणेतीनशे पानांची ही कांदबरी असे म्हटल्यास वावगे ठरू नये.  कांदबरीचे कथानक भारतात ६ डिसेंबर 1992रोजी वादग्रस्त धार्मिक वास्तू पडल्यानंतर बांगलादेशात उसळलेल्या दंगलीच्या भोवती फिरते. क