पोस्ट्स

जानेवारी १२, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

श्रीलंका कोणाचा मार्ग अनुसरणार ? भारताचा की कंबोडियाचा

इमेज
          सध्या श्रीलंकेची आर्थिक स्थिती धोकादायक अवस्थेत आहे . श्रीलंकेकडील परकीय गंजाजळी अत्यंत धोकादायक स्थितीवर आलेली आहे त्यामुळे खर्चात कपात करण्यासाठी आपले काही दूतावास बंद करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे या स्थितीतून बाहेर पडण्यासाठी श्रीलंकेकडे दोन मार्ग आहेत एक मार्ग म्हणजे भारताचा मार्ग आणि दुसरा म्हणजे कंबोडियाचा मार्ग.  श्रीलंकेतील सरकार यातली कोणता मार्ग निवडते?  हे बघणे अत्यंत उत्सुकतेचे ठरणार आहे          श्रीलंकेवर आता आहे तसा  कर्जाचा डोंगर नसला तरी परकीय गंजाजळी अत्यंत तळाला जाण्याचा अनुभव आपल्या भारतीयांनी घेतला आहे १९९१ जुलै महिन्यात आपली परकीय  गंजाजळी जेमेतेम काहीच दिवस पुरेल इतकीच होती त्यावेळी आपणास आवश्यक असणाऱ्या  नैसर्गिक इंधने आदींची आयात कशी करायची ? याबाबत मोठा प्रश्न होता त्याच्या आधी सुमारे १५ /१६ वर्षांपासून सुरु असणाऱ्या राजकीय कोलांट्या उड्या , सामाजिक सुरक्षितेचा प्रश्न यामुळे आपल्या परकीय गंजाजळीला प्रचंड आहोटी लागली परिणामी आपल्या रिझर्व बँकेकडून भारतातील सोने युनाटेड किंग्डम (इंग्लड ) कडे सोने तारण ठेवत आंतराष्ट्रीय नाणेनिधी (आय एम एफ )आणि जागति