पोस्ट्स

फेब्रुवारी ८, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

दुष्काळात तेरावा महिना

इमेज
    पाकिस्तानासाठी सध्या दुष्काळात तेरावा महिन्यासारखी स्थिती आहे आर्थिक स्थिती दिवानसोदिवस ढासळत असताना चीनसारखाच जीवश्च कंठश्च मित्र असलेला तुर्कीये (जुने नाव तुर्कस्थान ) भूकंपामुळे पूर्णतः उद्धवस्त झाला आहे . आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर पाकिस्तानने आवळलेल्या काश्मीरच्या रागात नेहमी सूर मिळवळणारा देश म्हणजे तुर्कीये (जुने नाव तुर्कस्थान ) होता सध्या या दोन्ही मित्रांची आर्थिक स्थिती अत्यंत दयनीय असताना पाकिस्तानची स्थिती  अधिकच  दयनीय असल्याने पाकिस्तानला बुडत्याला काडीचा आधार या नात्याने पाकिस्तानला काहीसा तुर्कस्थानच्या आधार होता सोमवारी झालेल्या भूकंपामुळे तो पूर्णतः मोडीत निघाला आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीसमवेत चालणारी बोलणी कोणत्याही ठोस निश्चित कृती कार्यक्रमाशिवाय अनिश्चित स्थितीत संपत आहे. नैसर्गिक इंधनाचे आणि अमेरीकी डाँलरबरोबरचा विनिमय दर सातत्याने वाढत आहे. देशातील सर्वात प्रबळ असलेल्या पंजाब प्रांताच्या अनेक भागात पेट्रोल आणि डिझेलची अभूतपूर्व इंधनाची टंचाई झाल्याची वार्ता येत आहे. परकीय चलनाचा साठा वेगाने शुन्यवत होण्याचा  दृष्टीने वाटचाल होत आहे. देशाच्या पश्चिम भागात दह