पोस्ट्स

जुलै २३, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

हे निसर्गा तूला झाले तरी काय ?

इमेज
    सध्या जगभरात निसर्गाने आपल्याला रौद्रस्वरुप दाखवून देण्याचा चंग बांधला आहे का? असा प्रश्न उपस्थित होण्यासारखी स्थिती आहे. आतापर्यतचे दक्षीण आशियातील सर्वाधिक अर्थात 52अंश सेल्यीयस तापमान पाकिस्तानातील जाकोदाबाद येथे नोंदवण्यात आल्यानंतर निसर्गानै रौद्ररुप दाखवण्यास सुरवात केली. ज्या देशातील एक तूर्तीयांश भाग ध्रुवीय प्रदेशात मोडतो त्या.कँनडातील.ब्रिटिश कोलंबिया या राज्यात 49.5 अंश सेल्यीयस तापमान नोंदवले गेले. उष्माघाताच्या या नाट्यानंतर निसर्गाच्या रौद्ररुपाचा पावसाचा अंक सुरू झाला आहे. आजमितीस पावसामुळे आपल्या महाराष्ट्रासह, पश्चिम युरोप आणि चीनमध्ये जनजीवन पुर्णतः उद्धवस्त केले आहे. त्यापैकी महाराष्ट्र आणि पश्चिम युरोपातील पावसाविषयी मी या आधीच सांगितले आहे. आता बघूया चीनमधील पावसाविषयी.      तर मित्रांनो, गेल्या चार ते पाच दिवसांपासून पश्चिम मध्य चीनमधील हेनास या प्रांतात पावसाने अक्षरशः नंगा नाच सुरु करण्यासारखी परीस्थिती आहे. वर्षभरातील एकुण पाउसाइतके पर्जन्य फक्त 3दिवसात झाल्याने हेनास  या प्रांतातील या झिंगझावू शहरात  भयानक स्थिती निर्माण झाली आहे. हे लिहीत असताना तिथे जवळप

डोगंरीच्या तूरुंगातून

इमेज
  जूलै महीन्याची अखेर जशी जवळ येते , तश्या ज्या गोष्टींची आठवण होते , त्यात लोकमान्य टिळक हे अग्रक्रमी असतात . लोकमान्य टिळकांचे भारतीय स्वातंञ्यलढ्यातील योगदान प्रचंड आहे यात वादच नाही . होमरुल चळवळ चा अपवाद वगळता गांधींसारखे कोणतेही आंदोलन लोकमान्य टिळकांनी केलेले आपणास दिसत नसले तरी त्यांचा लेखणीमुळे अनेकांना स्वातंञ्यलढ्यात प्राणापण करण्याची प्रेरणा मिळाली ज्यात चाफेकर बधुंचा प्रामुख्याने समावेश करता येइल. (या चाफेकरांचा बलीदानातूनच स्वातंञ्यवीर सावरकरांना स्वातंञ्यासाठी प्राणापर्ण करण्याची स्फुर्ती झाली होती ) स्वामी विवेकानंदाना यूनाटेड स्टेट मध्ये जाण्याचा सल्ला आणि त्यासाठी मदत उभारण्यात सूध्दा लोकमान्याचा वाटा होता. लोकमान्य टिळक आणी स्वामी विवेकानंद यांचे मुंबईते पुणे या दरम्यानचे  संभाषण प्रसिध्द आहेच.            लोकमान्य आणि गोपाळ गणेश आगरकर यांचे फारकाळ  सख्य झाल्याचे माञ दूर्दैवाने महाराष्ट्र बघू शकला नाही .जर तो प्रसिध्द वाद जर शेवटी ज्या टोकाला गेला ,त्या टोकाला गेला नसता तर महाराष्ट्रात सध्या फार वेगळे  चिञ दिसले असते .राजकीय आणि सामाजीक सुधारणा एकञीत करणारे राज्य म्हण