पोस्ट्स

डिसेंबर २०, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पाकिस्तानातील राजकीय अस्थिरता नाट्यमय स्थितीत !

इमेज
     नुकत्याच कतार देशात झालेल्या फ़ुटबाँल विश्वचषकाच्या अंतिम साम्यानात आपण अत्यंत चुरस अनुभवली . शेवटच्या क्षणपर्यंत विश्वचषकाचा मानकरी कोण होणार ?याबाबत प्रचंड उत्सुकता क्रीडाप्रेमींना लागलेली होती हा  जसा  अखेरीस नाट्यमय स्थितीत पोहोचला होता अगदी तशीच नाट्यमयता  पाकिस्तानात सध्या नागरिक अनुभवीत आहेत फरक एव्हढाच कि हि नाट्यमयता कोणत्या खेळातील नाही तर तर राजकारणाची आहे आता पाकिस्तानी राजकारणी लोकांनी त्यांच्या राजकारणापायी पाकिस्तानी पंजाबच्या सत्ताकारणाचा खेळच करून ठेवला असल्याने पाकिस्तानी नागरिकांना दोनदा खेळाचा आनंद लुटता येत आहे  आपल्या भारतात जसे संसदेच्या सत्तेचा मार्ग उत्तर प्रदेशातून जातो ज्यास उत्तर प्रदेशात बहुमत मिळते त्याच पक्षाचा  संसदेत पंतप्रधान होतो ( देवेगोडा सारखे सम्मानिय अपवाद वगळून ) हा आतापर्यंतचा आपला इतिहास आहे पाकिस्तानच्या राजकारणात हा मान त्यांच्या पंजाबला आहे पाकिस्तानी राजकारणात ज्याच्या हाती पंजाबची सत्ता तो पक्ष अत्यंत प्रबळ मानला जातो .सध्या याचा पाकिस्तानी पंजाबच्या विधानसभेत मोठे नाट्य बघायला मिळत आहे १७ डिसेंबरला पाकिस्तानचे विद्यमान प्रमुख विरोधी