पोस्ट्स

सप्टेंबर ५, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

केल्याने दुर्गपर्यटन

इमेज
      निसर्गाच्या सानिध्यात राहलो तर आपण अधिक काळ जिवंत राहू शकतो, असे वैद्यकशास्त्रातील मान्यवरांचे म्हणणे असते.यामुळे रोजच्या धक्काधकीचा जीवनातून वेळात वेळ काढून लोक निसर्गाचा सानिध्यात जाण्याचा प्रयत्न करतात. त्यासाठी ते विविध किल्यांवर थंड हवेच्या ठिकाणी,वनांमध्ये जाण्याचा प्रयत्न करतात.सिमेंटच्या जंगलातून बाहेर पडत खऱ्या विविध वनस्पतीच्या जंगलात जातात. मी सुद्धा त्यास अपवाद नाही. आणि त्यासाठीच मी विविध समाजोपयोगी कामे करणाऱ्या गरुडझेपच्या दुर्गवीरांच्या साथीने  5सप्टेंबर रोजी नाशिकपासून जवळच असणाऱ्या कावनाई या किल्ल्याला भेट दिली.     कावनाई हा किल्ला नाशिकपासून हाकेच्या म्हणजेच सुमारे 55 किमी आहे. नाशिकहून इगतपूरी कडे जाताना घोटीच्या आधी उजव्या हाताला एक फाटा फुटतो, त्या फाट्यातून सुमारे सात आठ किमी प्रवास केला की आपण किल्ल्याचा पायथ्यासी पोहोचतो. किल्ला हा टेहळणीसाठी वापरण्यात येत होता.किल्ल्याची चढाई सोपी या प्रकारातील आहे. सुमारे अर्धा ते पाउण तासात आपण सहजतेने किल्ला चढू शकतो.या किल्ल्याचा फारसा इतिहास उपलब्ध नाही गडावर एक देवी मंदिर , एक उघड्यावर असणारी शिव पिंड