पोस्ट्स

डिसेंबर २९, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

व्यथा एका दुर्लक्षित भारतीय जगजेत्तीची

इमेज
              सध्या  समस्त पारंपरिक भारतीय माध्यमे जसे वृत्तवाहिन्या , वृत्तपत्रे , रेडिओ ,  नववर्षाच्या आनंदांच्या बातम्या देत असताना या आनंदात दुधात साखर म्हणावी अशी  एक बातमी त्यांच्याकडून निसटून गेली आहे . ती सगळ्या लोकांपर्यंत पोहोचावी ,आणि त्यांचा आनदं व्दिगुणित  व्हावा   म्हणून या समाज  माध्यमाचा मार्फत मी आपणासी हा संवाद साधत आहे . आणि ती बातमी आहे .भारताची आघाडीची बुद्धिबळ महिला ग्रँडमास्टर असणारी कोनेरू हंपी यांनी महिला बुद्धिबळ खेळाडूंच्या जलदगती या प्रकारच्या स्पर्धेत जागतिक अजिंक्यपद मिळवण्याची . मित्रांनो , पुरुष गटात  विश्वनाथ आंनदच्या गैरहजेरीत खेळणाऱ्या भारतीय पुरुष खेळाडूंच्या या स्पर्धेत क्रमांक लागलाय तो 40 . यावरून तुम्ही या स्पर्धेची काठिण्य पातळी काय असेल याचा अंदाज घेऊ शकता . हा विजय आणखी एका कारणाने मह्त्वाचा आहे ते म्हणजे आई झाल्यावर सन 2016ते 2018 हे दोन वर्ष त्या स्पर्धात्मक बुद्धिबळापासून पूर्णतः अलिप्त होत्या . जे कोणत्याही खेळ अथवा कलेशी निगडित व्यक्ती आहेत .अश्या व्यक्तींना 2 वर्ष पूर्णतः  अलिप्त राहून त्यानंतर पुनरागमन करत थेट जागतिक विजेतेपद मिळ

60 व्या मन की बातच्या निमित्याने

इमेज
                       आज माझी वर्षाखेरच्या रविवारची सकाळ रंगली , ती 60 व्या "मन की बात " च्या प्रक्षेपणनाने . माननीय पंतप्रधान नरेंद मोदी यांनी भाषणाची सुरवात केली युवकांना संबोधून . युवकांची शक्ती अत्यंत मोठी असते . ती काहीही करू शकते . असे त्यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीला सांगितले . भाषणाच्या मध्यभागी त्यांनी विविध लोकांच्या गटाकडून करण्यात येणाऱ्या समाजसेवी कार्यांबाबत सांगितले . तर शेवट सूर्यग्रहणाच्या उल्लेखाने केला . . . आपल्या संबोधनात मोदींनी स्वामी विवेकानंद यांच्या कन्याकुमारी येथील शीला स्मारकाला 50वर्षे पूर्ण होत असल्याचा उल्लेख केला .तसेच भारतीयांनी महात्मा गांधींच्या आदर्श घेत सन 2022 पर्यंत स्वदेशी वास्तु वापरून  भारताच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्याचे आवाहन त्यांनी जनतेला केले                 मात्र  ज्या युवकांच्या शक्तीचा उल्लेख त्यांनी आपल्या भाषणात केला .तो  युवकवर्ग  आज कोणत्या स्थितीत आहे .याविषयी त्यांनी सोईस्कर मौन धरणेच पसंत केले .. सूर्यग्रहण बघण्याचा आनंद काही औरच असतो , असे सांगताना . देशातील वाढती अंधश्रद्धा ज्याचा प्रत्यय ब

मानसिक रोगाची राजधानी भारत ?

इमेज
              "मन करावे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण"  असे श्री समर्थ रामदास स्वामींचे सुप्रसिद्ध वचन आहे . कोणतेही कार्य पूर्ण करायचे असल्यास त्यासाठी मनस्थिती उत्तम असणे अत्यावश्यक आहे . असा या वाचनाचा आहे . अर्थात .मनस्थिती उत्तम नसल्यास  काय होणार ? हे वेगळे सांगण्याची गरज नाही .कोणतेही कार्य होणारच नाही  , आणि  भारत त्या दिशेने तर वाटचाल करत नाहीये ना ? असा प्रश्न उपस्थित व्हावा,  अशा अहवाल 23डिसेंबर 2019 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या लॅन्सेट या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आला आहे . इंडियन मेडिकल असोसियन या संस्थेमार्फत हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे . या अहवालत सांगितल्याप्रमाणे दर 7 भारतीयांपैकी एक भारतीय विविध मानसिक रोगांनी ग्रस्त आहे . टक्यांच्या भाषेत बोलायचे झाल्यास हे प्रमाण 14 % येते .  हे प्रमाण अर्थात चिंताजनक असून देखील भारतातील  पारंपरिक प्रसार माध्यमे  ज्यात वृत्तपत्रे , वृत्तवाहिन्या , रेडिओ यांचा समावेश होतो , त्यांनी या मुद्यांची यथोचित दखल न घेतल्याने मला समाज माध्यमांव्दारे  याची भीषणता आपणासमोर मांडावी लागत आहे . माझे आजचे लेखन त्यासाठीच .