पोस्ट्स

मराठवाडा लेबलसह पोस्ट दाखवत आहे

पर्यटनाच्या दृष्टीने प्रयत्नशील मात्र दुर्लक्षित जिल्हा उस्मानाबाद (धाराशिव जिल्हा )

इमेज
        आपला महाराष्ट्र पर्यंटनस्थळाच्या दृष्टीने अत्यंत समृद्ध आहे . राज्याचा असा कोणताही जिल्हा नाही कि ज्यात पर्यटनस्थळ नाही कोल्हापूर पासून नंदुरबार आणि मुबई शहर पासून गडचिरोली गोंदिया या सर्व जिल्ह्यात आपणास पर्यटन स्थळे आढळतात . मात्र काही जिल्हे खास पर्यटनासाठी ओळखले जातात तर काही पर्यटनाच्या दृष्टीने काहीसे अपरिचित आहेत परुंतु त्या जिल्ह्यत पर्यटनस्थळे नाहीत असे नाही अश्याच पर्यटनाच्या दृष्टीने काहीसा अपरिचित मात्र पर्यटनाच्या दृष्टीने प्रसिद्धी होण्यासाठी धडपडणारा जिल्हा म्हणजे  उस्मानाबाद (धाराशिव जिल्हा ) ,महाराष्ट्रात पालघर या जिल्ह्याच्या अपवाद वगळता अन्य सर्व जिल्ह्याची जिल्ह्याचे नाव नंतर एनआयसी इन या डोमिन नेमखाली जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाची वेबसाईट आहे (पालघरला डोमेन नेम जीओव्ही इन आहे )  ज्यामध्ये जिल्ह्यातील पर्यटनस्थळांची माहिती दिलेली असते  तशीच ती उस्मानाबाद जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यलयाच्या वेबसाईटवर देण्यात आली आहे . मात्र उमसनबाद जिल्ह्याच्या वेबसाईटवर देण्यात आलेली माहिती हितालुक्यानुसार  देण्यात आली आहे म...

संत नामदेव आणि साइबाबा यांच्या वास्तव्याने पुनित झालेले जिल्हे हिंगोली आणि परभणी

इमेज
  आपल्या महाराष्ट्रातील काहीसा अविकसीत समजल्या जाणारा मराठवाडा मात्र अध्यात्मिक क्षेत्रात मात्र महाराष्ट्राच्या अन्य भागापेक्षा खुपच जास्त श्रीमंत आहे. आख्या भारतात असणाऱ्या 12 ज्योतीलिंगापैकी 3 ज्योर्तीलिंगे, देवीच्या साडेतीन शक्तीपीठापैकी 2पुर्ण पीठे, संत ज्ञानेश्वर , संत निवृत्तीनाथ संत मुक्ताबाई, संत नामदेव साईबाबा, संत रामदास स्वामी अस्या अनेक संताची जन्मभुमी , गणेश पुराणात सांगितलेल्या गणपतींच्या साडेतीन पीठांपैकी एक पुर्ण पीठ राजूर, इस्लाममधील भक्ती चळवळ म्हणता येईल असी सुफी चळवळीत महत्तावाचे स्थान असणारे दर्गे मोठ्या संख्येने असणारा प्रदेश म्हणजे मराठवाडा, शिख बांधवांच्या पवित्र पाच स्थानांपैकी एक असणारे नांदेड देखील मराठवाड्यातच येते.याच मराठवाड्यातील साईबाबांच्या जन्माने आणि संत नामदेव महाराज यांच्या वास्तव्याने पुनित झालेल्या परभणी आणि हिंगोली जिल्ह्याला मी नुकतीच भेट दिली त्यावेळी मला आलेले अनुभव आपणास सांगण्यासाठी आजचा लेखन प्रपंच . तर मित्रांनो आपण अनेकदा विविध देशात फिरायलो जातो मात्र अनेकदा आपल्याला आपल्याच राज्यातील अनेक पर्यटनस्थळे माहिती नसतात.माझ्या बाबतीत असे ह...

29 वर्षापूर्वीची ती काळरात्र -

इमेज
 दिनांक 9 सप्टेंबर 2022   रोजी आपण अनंत चतूर्दशी साजरी करत आहोत .  या दिवशी भगवान गणराय आपली पृथ्वीवरील दहा दिवसांची यात्रा संपवून परत  कैलाशावर जातात, अशी मान्यता आहे . याच अनंत चतूर्दशीचा दिवशी आजपासून 29   वर्षापूर्वी म्हणजेच सन 1993 साली सप्टेंबर महिन्यात 30 या दिवशी गणपतीने कैलासला जाताना महाराष्ट्रातील अनेक लोकांना आपल्या बरोबर नेले , .गणरायाचे विसर्जन करून ते झोपे गेले ते कायमचेच.   लातूर  किल्लारी चा भुकंप म्हणून ही घटना सगळ्यांना माहिती आहे   मित्रांनो 25 वर्षाची एक पिढी मानण्यात येते, या हिशोबाने लातूर किल्लारीचा भुकंप होवून एका पिढीचा कालावधी उलटून गेला आहे .यामध्ये सदर परीसर पुर्णपणे बदलला गेला आहे , यात शंकाच नाही . मात्र या भुकंपात अनेक कुटुंबातील एखाद दुसऱ्याचा अपवाद वगळता सर्वचा सर्व व्यक्ती मृत्युमुखी पडलेल्या होत्या . 20व्या शतकातील सर्वात मोठ्या दुर्घटनेत या भुकंपाचा विचार होतो. तिथीने 29 वर्षे पुर्ण झाल्याबद्दल यात मृत्युमुखी पडलेल्या ,आत्पेष्ठ गमवलेल्या सर्वांना आदरांजली. .लातूर किल्लारी परीसराला लागून असलेल्या कर्नाटक राज्य...

एकाचवेळी दोन वेगवेगळ्या टोकांवर असणारा प्रदेश मराठवाडा

इमेज
             गेल्या महिनाभरात दोनदा नाशिकहून मराठवाड्यात फिरण्याचा योग आला.पहिल्यांदा पर्यटनाच्या उद्देशाने जालना जिल्ह्यात फिरलो .त्यानंतर पंधरा दिवसांनी पर्यटनाच्या उद्देशाने बीड जिल्ह्यातील पर्यटनस्थळांना भेट दिली. या दोन्ही भेटी दरम्यान मला आढळलेली एक महत्तवाची गोष्ट म्हणजे मराठवाड्यातील रस्त्यांची अतिशय चांगली अवस्था तसेच या उलट एखाद्या वस्तू संग्रालयात शोभावी असी ब्रिटीशकालीन रेल्वे व्यवस्था .एकाचवेळी दोन भिन्न टोकाच्या विरोधाभास असणाऱ्या वाहतूक व्यवस्था या एकाच प्रदेश्यात सुखानैव नांदत असल्याचे चित्र आपणास मराठवाडा प्रदेशात सर्व ठिकाणी सहजतेने दिसते.          बीड आणि जालना जिल्ह्याचा विचार करता अगदी खेड्याचा दारापर्यंत उत्तम, रस्त्यावर खड्डा दाखवा दहा हजार रुपये मिळवा असी योजना सुरु करावी अस्या पद्धतीचे रस्ते आहेत. या दोन्ही जिल्ह्यातील अनेक रस्त्यांना ,तसेच यांना जोडणाऱ्या अनेक उपरस्त्यांना राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देवून त्यांचे क्राँकिटीकरण तसेच रुंदीकरण केल्याचे या जिल्ह्यात फिरताना सहज दिसून येते.या नव्याने बांधले...

मराठवाड्यातील एक दिवस

इमेज
   मी पुण्यात असताना, दर शनिवारी सायंकाळी एसटी बसने फिरायला जात असे .शनिवारी आँफिस सुटले की मी घरी न जाता बसस्टँडवर जात असे. तेथून बस पकडून दुसऱ्या गावात जावून रविवारी सायंकाळी चार पाचपर्यत त्या गावात फिरुन पुन्हा पुण्यात येत असे, आणि सोमवारी पुन्हा आँफिसमध्ये रुजु होत असे.त्यावेळी मी सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे  या जिल्ह्यात भरपूर भटकलो.मात्र पुणे सुटले, आणि यात बराच खंड पडला ,मात्र सध्या कोव्हिड 19संपल्याने आणि माझ्या प्रवाश्याचे प्रमुख साधन असलेली एसटी पुन्हा जोमाने सुरु झाल्याने  मी आता या फिरण्याचा पुन्हा प्रारंभ करत आहे.ज्याची सुरवात मी 15 मे रोजी जालना जिल्ह्याला भेट देवून केली.     मी जालना या ठिकाणची  फिरण्याचे ठिकाण  म्हणून निवड    नविन जाणून घेण्याची उत्सुकता तसेच जाण्यायेण्याचा वेळ ,आणि एकुण वेळेची उपलब्धता या निकषांवर केली.माझ्या  होम टाउन असलेल्या नाशिकचा.विचार करता मराठवाड्याचे प्रवेशद्वार असलेल्या औरंगाबाद या जिल्ह्यातील भद्रा मारुती, पैठण, अजिंठा वेरुळ, घुष्णेश्वर ,बिबिका मकबरा आदी स्थाने या आधी बघीतल्य...

93व्या साहित्य संमेलनामुळे मनात उमटलेले भावतरंग

इमेज
                  दिनांक 10 जानेवारी 2020ला उस्मानाबाद येथे  93व्या साहित्य संमेलनाचे उदघाटन झाले . मला कळायला लागल्यापासूनचे हे 15/16संमेलन . मी नाशिकला वनप्रेमी असणारे ज्येष्ठ साहित्यिक  मारुती चितमपल्ली हे  संमेलाध्यक्ष असणारे साहित्य संमेलन आणि पुण्यात सर परशुराम भाऊ महाविद्यालयाच्या प्रांगणात झालेले साहित्य संमेलन  ही दोन संमेलने अगदी जवळून त्यातील कार्यक्रमांच्या आस्वाद घेत अनुभवली . बाकीच्या साहित्य संमेलनांच्या कार्यक्रमांच्या प्रसार माध्यमांनी केलेल्या  बातम्यांच्या स्वरूपात अनुभवली . माझ्या मते या सर्व साहित्य संमेलनांमध्ये  होणारे वाद , (ज्यामध्ये साहित्य क्षेत्राशी प्रत्यक्ष संबंध असणारे आणि साहित्य क्षेत्राशी अप्रत्यक्षरित्या संबंधित असणारे दोन्ही वाद मला अपेक्षित आहेत ) त्यावर विविध लोकांची मते , या संमेलनाच्या आयोजनावरून  ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे सारख्या व्यक्तीची मते,  . यासाठी सरकारतर्फे देण्यात येणारे अनुदान , त्यावरून उठणारे वादंग , या सर्व स...

चेन्नइ , मराठवाडा , भविष्याची चाहुल देणारे ठिकाणे

इमेज
               आज हा मजकूर लिहित असताना, भारतातील आसाम, बिहार , आदी राज्यात पावसाने कहर केला  आहे , मात्र याच भारतातील मराठवाडा हा विभाग आणि चेन्नई या शहरात पाण्यासाठी वणवण करायची वेळ आलीये       आजमितीस मराठवाड्यात अत्यंत कमी पाणी आहे .तर चेन्नई शहरात रेल्वेने पाणी आणण्याची वेळ आलीये . काही जण चेन्नई शहरातील पाण्याचा आणीबाणीला कर्नाटक बरोबर तामिळनाडू या राज्यांमध्ये कावेरी नदीच्या पाणी वाटपावरुन सुरु असणाऱ्या वादाला जवाबदार धरतील . मात्र हा वाद  पाण्याचा अनुपलब्धतेमुळेच हा वाद  सुरु झालायं, हे मात्र नाकारुन चालणार नाही . मराठवाड्यात त्याचा भौगोलिक स्थानामुळे अत्यंत कमी पाउस पडतो . त्यातही जो काही पाऊस पडतो तो जमीन जांभ्या खडकांची असल्याने पाणी फारसे जमिनीत मुरत नाही . परिणामि दर एक दोन वर्षानंतर मराठवाड्यावर पाण्यासाठी दाही दिशा फिरण्याची वेळ येते . सध्याच्या बदलत्या हवामानाचा काळात  पावसाचा लहरीपणा वाढल्याने यामध्ये भरच पडत आहे . आत्यंतिक राज्यनिष्ठा असलेल्या कर्...