पोस्ट्स

डिसेंबर ५, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सर पे लाल टोपी रुसी

इमेज
           सन १९५५ साली राज कपूर , नर्गिस  यांनी अभिनय केलेला एक उत्तम चित्रपट येऊन गेला श्री ४२० नावाचा , त्यात राज कपूर यांच्यावर चित्रित झालेले एक गाणे आहे मेरा जुता है जपानी ....  सर पै लाल टोपी रुसी फिर भी दिल है हिंदुस्थानी .!  भारत आणि विविध देशांशी असणाऱ्या त्यावेळेच्या संबंधावर कटाक्ष टाकणारे गाणे .  ज्यामध्ये रशिया आणि भारताच्या संबंधाचा  उल्लेख करताना सर पे लाल टोपी रुसी फिर भी दिल है हिंदुस्थानी . असा उल्लेख करण्यात आला आहे             रशिया जगातील क्षेत्रफळाचा विचार करता सर्वात मोठा देश . भारतात उगम पावलेला बुद्धिबळ हा खेळ ज्या देशाचा राष्ट्रीय खेळ आहे असा देश . बॉलिवूड ज्या देशात अत्यंत लोकप्रिय आहे असा भारतीय उपखंडाबाहेरचा देश . एकेकाळचा बॉलिवूडचा सुपरस्टार  ,राज कपूर यांची कोणतीही धार्मिक वांशिक साम्यता नसताना  चाहते असणारा देश , संयुक्त राष्ट्र सांगता वेळोवेळी भारताची पाठराखण करणारा देश , भारताला वेळोवेळी शस्त्रात्रे देणारा देश,  जो आजमितीस देखील भारताच्या शस्त्रास्त्रे आयातीत तब्बल ६४ %  ( संदर्भ wion news) हिस्सा ठेवतो . ज्याने आजपासून ५० वर्षापूर्वी  बांगलादेश मुक्