पोस्ट्स

नोव्हेंबर १३, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

धोका अद्याप टळलेला नाही

इमेज
                आपल्या महाराष्ट्रात कोणत्याही बाजारपेठेत फेरफटका मारल्यास कोव्हीड १९ नावाचा कोणता रोग कधीकाळी तरी अस्तित्वात होता का ? अशा प्रश्न उपस्थित व्हावा असे चित्र सहजतेने दिसते.  आपण कोव्हीड १९च्या प्रसार रोखण्यासाठी दिड वर्षांपूर्वी अंमलात आणणारे सुरक्षेचे उपाय पूर्णतः गुंडाळलेले दिसतआहे .करोना चा धोका पूर्णतः टळलेला आहे असेच बाजरपेठेतील बहुसंख्येने वर्तन असते . मात्र कोव्हीड १९चा धोका अद्याप टळलेला नसल्याचे,  जर्मन सरकारची अधिकृत वृत्तवाहिनी असलेली DW , फ्रांस सरकारची अधिकृत वृत्तवाहिनी असलेली  FRANCE 24,आणि भारतीय मालकीची परदेशी बातम्या सहज सोप्या भारतीय उच्चाराच्या इंगजीत देणाऱ्या WION आदींच्या बातम्या बघितल्या तर सहजतेने लक्षात येत आहे     युरोपीय युनियनच्या हेल्थ केअर युनिटने दिलेल्या एका इशाऱ्यानुसार युरोपातील १० देशात कोव्हिडचा धोका पुन्हा एकदा गंभीर स्वरूप धारण करत आहे . जर्मनीत नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यच्या पहिल्या पाच दिवसात दररोज केलेल्या एक हजार चाचणीत २६७ रुग्ण आजाराने गस्त असल्याचे समजत आहे , जर्मनीत , नेदरलँड आदी देशात पुन्हा एकदा लॉकडाऊन करावा या मागणीने जोर