पोस्ट्स

डिसेंबर ३, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

बुद्धीबळाचे मानसशास्त्र (भाग6)

इमेज
बुद्धिबळ हा खेळ जसा दिसतो , तितका सोपा नाही. कारण हा खेळ मानसिक आहे. विचार म्हणजेच मन असते. यामुळे आपली मानसिक वैचारिक  स्थिती कशी आहे ? यावरून खेळाडूला बुद्धिबळात किती यश मिळणार ?  हे निश्चित होतेबुद्धिबळात एकच खेळ तीनदा खेळावा लागतो, पहिल्यांदा खेळाची सुरवात करताना अर्थात ओपनींगला , त्यानंतर मिडलगेम आणि तिसऱ्या टप्यात एन्ड गेमच्या वेळेस खेळाडूला खेळावे लागते . या तिन्ही वेळेचा चांगला अभ्यास करून खेळाडूला आपला दर्जा सिद्ध करावा लागतो .  यशस्वी खेळाडूंची अंतस्थ शक्ती म्हणजेच मनोवृत्ती खंबीर असते . यासाठी उदाहरण म्हणून आपण बॉबी फिशरचा विचार करू शकतो . रशियन खेळाडूंना हरवून जगजेत्ता होण्याचे स्वप्न त्याने उराशी बाळगले आणि ते सत्य करून दाखवले . तेच ध्येय उराशी बाळगत त्याने जगजेत्ता होण्याची स्पर्धा खेळला असे त्याने जगजेत्ता झाल्यावर दिलेल्या मुलाखतीत सांगितले . यासाठी त्यांच्या मानसिकतेच्या अभ्यास प्रत्येक बुद्धिबळपटूने कार्यालाच हवा . सध्याचा काळात मँग्नस कार्लसनचेउदाहरण देता येईल मँग्नस कार्लसन खेळताना कुठलाही हावभाव आपल्या चेहऱ्यावर येऊ देत नाही. जगजेत्ता स्पर्धा जिंक्याचीच हाच निश्चय

गोव्याची भरारी !

इमेज
गोवा , महाराष्ट्राचा दक्षीणेकडील छोटेसे राज्य, भारत ब्रिटीशांपासून स्वतंत्र्य झाल्यावर 14वर्षांनी पोर्तुगीज राजवटीतून मुक्त झालेले, ज्याचा स्वातंत्र्य लढ्याविषयी महाराष्ट्र एस.स.सी. अभ्यासक्रमामध्ये भारतातीलच स्वातंत्र्य लढा असून देखील फारच कमी उल्लेख आहे (तसे त्या अभ्यासक्रमात  ब्रिटीशाविरोधातील स्वातंत्र्य लढ्याविषयी असणाऱ्या माहितीचा तूलनेत फक्त गोवाच नाही तर दमण-दिव पाँडेचरी, दादरा नगरहवेली यांच्या स्वातंत्र्य लढ्याविषयी  फारसे  शिकल्याचे मला आठवत नाही.) ख्रिस्ती समाजबांधवांची मोठ्या प्रमाणात वस्ती असून देखील कोणत्याही धार्मिक वादाच्या केंद्र नसणारे , (या उलट इशान्य भारत) एक शांतताप्रिय ,पर्यटनस्नेही राज्य म्हणजे गोवा.      तर असे हे गोवा राज्य वेगाने इलेक्ट्रॉनिक बसेसकडे जात आहे. गोव्याचा वृत्तपत्रात येणाऱ्या बातम्यांनी ही गोष्ट सिद्ध होत आहे. नुकतीच गोवा राज्याची एसटी बस असणाऱ्या कदंब ट्रान्सपोर्ट मध्ये 100इलेक्ट्रॉनिक बसेस घेण्यास मंजूरी देण्यात आली.ocraa या कंपनीच्या या बसेस आहेत. या शिवाय 500बसेस कंदबमध्ये समाविष्ट करण्याचा हालचाली सुरु झाल्याचे गोव्यातील वृत्तपत्रे बघीतल्यास