पोस्ट्स

सप्टेंबर १०, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

ब....... बुद्धिबळाचा (भाग 3)

इमेज
         सध्या गणेशोत्सवामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण असताना दुधात साखर पडावी , अशी घोडदौड बुद्धिबळ ऑलम्पियामध्ये  भारताचा संघ करत  आहे.   8 सप्टेंबररोजी दोन संघाना पराभवाचे पाणी पाजून आणि एका संघाबरोबर बरोबरी करत स्वतःच्या पूलमध्ये दुसरे स्थान मिळवलेल्या भारताच्या संघाने 9 सप्टेंबर रोजी त्याहून उत्तम कामगिरी करत स्वतःचा पूलमध्ये प्रथम स्थान मिळवले .भारतीय बुद्धिबळ संघाने  9 सप्टेंबर रोजी झालेल्या मॅचेसमध्ये तिन्ही संघांविरुद्ध विजयश्री मिळवत हंगेरीला मागे टाकत पूलमध्ये प्रथमस्थानावर  होण्याचा विराजमान होण्याचा मान मिळवला    .या स्पर्धेत चीनने दोन संघ उतरवले आहेत एक संघ चीन या नावाने खेळात आहे तर दुसरा संघ सेंझान चीन या नावाने खेळत आहेत त्यातील सेझान चीन या संघाविरुद्ध पाच विरुद्ध एक अशा सरळ विजय मिळवत भारताने या यशाला गवसणी घातली आहे .या सेझान चीन खेरीज अझरबैजान या देशाविरुद्ध चारदेशाविरुद्ध   विरुद्ध दोन आणि बेलारूस या देशाविरुद्ध साडेतीन विरुद्ध अडीच अशी कामगिरी करत भारतीय बुध्दिबळसंघाने ही  कामगिरी केली आहे .            चीनविरुद्धच्या लढतीत आर वैशाली यांनी ली ज्यूंचा तर पेटला हरिकृ

गणेशाची साडेतीन पीठे

इमेज
  आपल्या महाराष्ट्रात साडेतीन शक्तिपीठे म्हंटली की प्रामुख्याने  देवीची शक्तिपीठे आठवली जातात . मात्र आपल्या महाराष्ट्रात गणपतीची देखील शक्ती पीठे आहेत . सध्याच्या गणेशोत्सवाच्या  काळात त्यांची माहिती करून घेउया .या साडेतीन गणपतीच्या दर्शनाने मोठे पुण्य मिळते अशी श्रद्धा आहे . भगवान गणपतीने मयूरेश्वराच्या वध केला असता त्याचे शरीर ज्या ज्या ठिकाणी पडले  त्या त्या  ठिकाणी ही पुण्यक्षेत्रे निर्माण झाली अशी कथा सांगितली जाते .                                 मोरगाव  - 'भूस्वानंदपूर ' म्हणजेच आजचे प्रचलित 'मोरगाव'. गाणपत्य सांप्रदायाचे आद्यपीठ मोरगाव. या क्षेत्राचा आकार मोरासारखा आहे. ब्रम्ह, विष्णू, महेश, सूर्य व शक्ती या पंचदेवांनी ॐकार स्वरूपी गणेशाची तिथे स्थापना केली. उन्मत्त सिंदुरासुराचा वध करून त्याचा सेनापती कमलासूर याचाही वध श्री गणेशाने केला. कमलासूराचे शीर  जमिनीत गाडून त्याच्यावर तो आरूढ होऊन बसला. आजही त्याचे प्रतिक म्हणून विजयादशमीच्या दिवशी मोठा   उत्सव होतो. येथे गणेशापुढे नंदी आहे हे याचे वैशिष्ठ्य.   पुण्यापासून ५२ कि.मी. वर मोरगाव क्षेत्र आहे.पुणे ते मोरग