पोस्ट्स

मार्च ५, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

कथा न झालेल्या तिसऱ्या महायुद्धाची

इमेज
             सध्या भारतीय वृत्तवाहिन्या रशिया आणि युक्रेन  यांच्यातील युद्धाचे वर्णन तिसरे महायुद्ध म्हणून करत असले तरी,  याच्यापेक्षा गंभीर परीस्थिती एकदा उदभवली होती .ज्यावेळी खरोखरीच जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर उभे होते .  ज्याला जगाच्या इतिहासात क्युबन  क्रायसिस म्हणून ओळखले जाते . या क्युबन    क्रायसिस मध्ये सहभागी असणाऱ्या तीन पैकी दोन देशांकडे घातक अण्वस्त्र होती . फक्त एका कळ  दाबायचा अवकाश,  एकमेकांवर अण्वस्त्रे गेलीच म्हणून समजा,  अशी त्यावेळी स्थिती होती मात्र त्यावेळी जगाच्या महासत्तेच्या प्रमुखांनी ही स्थिती शांततापूर्वक हाताळली, आणि जग तिसऱ्या महायुद्धापासून दूर गेले . सध्याचे रशिया युक्रेन युद्ध त्यावेळच्या  क्युबन  क्रायसिसच्या तुलनेत काहीच नाही.  सध्याच्या रशिया युक्रेन युद्धात एकाच गट लष्करीदृष्ट्या प्रबळ आहे , ,तर दुसरा गट अन्य देशांच्या मदतीने दुसऱ्या गटाशी लढायचा प्रयत्न करत आहे . त्यामुळे तिसऱ्या महायुद्धाची शक्यता या वेळी खूपच कमी प्रमाणात आहे मात्र तशी स्थिती त्यावेळी नव्हती .        तर मित्रानो मी ज्या क्युबन क्रयसिसची गोष्ट करत आहे तो घडला १६ ऑक्टोबर त