पोस्ट्स

नोव्हेंबर ८, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

चीनचा विस्तारवाद सुरुच

इमेज
                        आपल्या भारताइतकीच प्राचीन संस्कृती असलेल्या, क्षेत्रफळाच्या दृष्टीने विचार केला असता  जगातील तिसऱ्या क्रमांकाचा मोठा देश असणाऱ्या चीनचा विस्तारवाद अजूनही सुरु असून  त्यांनी नेपाळच्या 5 जिल्ह्यातील एकत्रीत 150 हेक्टर जमिन स्वतःच्या नियंत्रणात घेतल्याचे नुकतेच स्पष्टपणे निर्दशनास आले आहे.या मुळच्या नेपाळच्या मात्र चीनने अनधिकृतरीत्या घेतलेल्या भुभागावर चीनने काही इमारती आणि लष्करी ठाणी उभारली असल्याची माहिती युनाटेड किंग्डमच्या काही माध्यम़ानी दिली आहे                  नेपाळ आणि चीनची सिमा हिमालयाच्या डोंगराळ भागातून जात असल्याने नदीच्या तिर किंवा एखादा खांब उभारुन ही सीमा निश्चित केली आहे. चीनच्या लष्कराने (ज्याला पिपल्स लिबरेशन आर्मी अथवा संक्षिप्त स्वरुपात पि एल ए म्हणतात) हे खांब उखडून अथवा नदीच्या प्रवाहात बदल करुन ही घुसखोरी केली आहे. नेपाळच्या ज्या भागात चीनने घुसखोरी केली आहे, त्या भागातील नेपाळी नागरीकांचे विविध उत्पादने चीनकडून खरेदी करण्यात येत असल्याने तेथील नागरीकांनी ही घुसखोरी सहन केली आहे .              आधूनिक चीनचा संस्थापक माओ याचा मते चीनचा तळवा