पोस्ट्स

नोव्हेंबर ११, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

देशातील बदलते सार्वजनिक परिवहन विश्व आणि आपली एसटी

इमेज
        सध्या देशातील परिवहन व्यवस्था वेगाने कात टाकत आहे.तामिळनाडु कर्नाटक सारखी मोठी आणि प्रगत राज्येच नव्हे तर हिमाचल प्रदेश सारख्या काहीस्या छोट्याशा राज्यातील सार्वजनिक परिवहन सेवा देखील अधिक आरामदायी प्रवाश्यांना हिताचा विचार करणारी सेवा देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे इंटरनेटवर या संदर्भात माहिती घेतल्यास सहजतेने दिसून येते.      कर्नाटक तेलंगणा सारखी राज्ये अंबारी ऐरावत या ब्रँडनेमखाली अत्यंत आरामदायी सेवा ते देखील विविध मार्गांवर देत आहेत.गुजरात राज्याने देखील गेल्या काही महिन्यांत आपल्या सेवेचा दर्जा खुपचं उंचावला आहे. गुजरात राज्याने सर्वसाधारण प्रवाश्यांचा विचार करत आपल्या सर्वसाधारण प्रवाशी गाड्यांमध्ये पुर्वीपेक्षा अधिक आरामदायी आसने पुरवली आहेत बसमधील अनावश्यक गर्दी कमी करण्यासाठी त्यांनी पुर्वीची ३बाय २ची आसनव्यवस्था मोडीत काढत २बाय २ची आसन व्यवस्था सुरु केली आहे. आपल्या एकुण बसेसपैकी जवळपास 50 टक्के बसेस इलेक्ट्रिक साधनांवर चालवण्याचा चंग बांधणारे गोवा हे राज्य असो किंवा अंबारी सारखी भारतातीलच नव्हे तर आशिया खंडातील सर्वात लांब 52लोकांची झोपण्याची सोय असणारी