पोस्ट्स

जून २, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

आठवणी चीनच्या दडपशाही च्या

इमेज
                     सध्या समस्त जगत करोनामुळे चीन विरोधात एकवटले आहे. करोनाबरोबर आपल्या भारताच्या सिमेवरील तणावामुळे आपल्या भारतात चीन विरोधाची धार अधिकच तीव्र आहे ,आणि तेही जून महिन्यात . मित्रांनो तूम्हाला वाटेल मी जून महिन्याचा उल्लेख का केला ?तर याच जून महिन्यात चीनने आजपासून बरोबर तीस वर्षापूर्वी आपल्याच नागरीकांना रणगाड्याखाली चिरडले होते . सन 1989ला तीन जूनच्या रात्री, चार जूनच्या पहाटे चीनच्या राजधानीत बिजींगमध्ये हे हत्याकांड घडले होते . यावेळी चीनने आपल्याच किती नागरीकांना मारले याबाबत हजारो ,ते लाखोपर्यत विविध दावे केले जातात. याचा अधिकृत आकडा अद्याप कोणालाच माहिती नाही. याला तिआनमेन स्केअर हत्याकांड म्हणून ओळखले जात  सध्या चीनच्याच हाँगकाँंगमध्ये सुरु असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभुमीवर  याची आठवण होणे स्वाभाविक आहे.                   मित्रांनो हे हत्याकांड झाले होते, चीनमध्ये लोकशाही प्रस्थापित व्हावी,यासाठी लढणाऱ्या आंदोलकाचे. 15एप्रिल 1989पासून सुरु असलेल्या या आदोंलनाची अखेर आंदोलकांच्या मागण्या मान्य न होता, त्यांच्या मृत्यूत झाली. यामुळे चीनमधील तरुणाइचा आवाज