पोस्ट्स

मे १३, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

खगोलशास्त्राची संशोधनाची दिशा बदलणारा शोध

इमेज
            १२ मे २०२२ हा दिवस खगोल शास्त्राच्या इतिहासात सुवर्णक्षणांनीं लिहला जाईल गेल्या कित्येक  वर्षांपासून खगोल शास्त्रज्ञांना खुणावत असणाऱ्या आपल्या आकाशगंगेच्या मध्यभागी असणाऱ्या कृष्णविवराच्या फोटो शास्त्रज्ञांना मिळाला असल्याचे यावेळी जगभरात विविध पत्रकार परिषदेमार्फत एकाचवेळी जाहीर करण्यात आले आणि समस्त खगोलप्रेमींमध्ये एक नवचैत्यन संचारले .आतापर्यंतच्या विज्ञानाचा इतिहासात कृष्ण विवराच्या फोटो घेण्याची ही दुसरीच वेळ होती या आधी एम ८७ या दीर्घिकेत असणाऱ्या कृष्णविवराचे छायाचित्र टिपण्यात मानवाला यश मिळाले होते . १८ व्या शतकात धूमकेतू शोधण्याची जगभरात मोहीम मोठ्या प्रमाणात सुरु होती . अनेक  खगोलप्रेमी या काळात  आपापली दुर्बीण घेऊन आकाशाचा वेध घेत होती . त्यातीलच एक प्रमुख नाव म्हणजे चार्ल्स मेसिंजर होय त्यांनी आणि त्यांच्या शिष्याने मिळून आकाश्यात एकूण ११० खगोलीय घटक शोधले ज्यात अनेक तारकासमूह , उपग्रह , आणि अन्य खगोलीय वस्तूंचा समावेश होतो चार्ल्स  मेसिंजर  यांच्या समांमनार्थ या खगोलीय घटकांना एम १ . एम २५ , एम ४९ अशी नावे दिली आहेत त्यातीलच एक म्हणजे एम ८७ होय . एम ८७ हि