पोस्ट्स

मे २९, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

नेपाळ वीस वर्षापुर्वीचा आणि आताचा !

इमेज
                        तारीख 1 जून 2001..... स्थळ काठमांडूतील राजाचा राजवाडा ........  वेळ नेपाळी प्रमाणवेळेनुसार रात्री सव्वा नउची.....   राजपरीवातील एक सदस्य राजाचा सख्खा भाउ वगळता सर्वजण साप्ताहिक पारीवारीक भोजनासाठी एकत्र आलेले. अचानक कोणाच्या ध्यानीमनी नसताना भावी राजा दिपेंद्र याने स्वतःच्या रायफलीमधून बेछूट गोळीबार केला.नंतर स्वतःच्या डोक्यात गोळी झाडली. या गोळीबारातून भावी राजा   दिपेंद्रची   काकू, त्याचा चूलत भाउ, आणि त्या वेळेस तिथे नसणारा काका सोडून सर्व जण तात्काळ मरण पावतात. भावी राजा  दिपेंद्र चे  3जून रोजी निधन होते. भावी राजा  दिपेंद्र चे एका मुलीवर प्रेम होते. तो तीला घराण्याची सून म्हणून घरी आणू इच्छित असतो. मात्र राजाचा किंबहूना राणीचा त्यास विरोध असतो. यातून घराण्यात धूसफूस सुरु असते. या धूसफुसीतून भावी राजाने हे हत्याकांड केल्याचे अधिकृतरीत्या सांगण्यात आले.मात्र अनेकांचा मते भावी राजा दिपेंद्र असे कृत्य करण्यास धजावणार नाही. राजाचा भावाने सत्ता मिळवण्यासाठीच हे काम केले , त्यासाठी त्याच मुलगाच आणि पत्नी कशी काय वाचली ? तसेच नेमक्या वेळी तोच बाहेर कसा ?असा प्रश्न