पोस्ट्स

डिसेंबर १२, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पाकिस्तान समस्येच्या चक्रीवादळात

इमेज
      सध्या आपले शेजारील राष्ट्र पाकिस्तान एका प्रचंड मोठ्या समस्येच्या चक्रीवादळात सापडले आहे. आर्थिक संकट कमी की काय ?म्हणून पाकिस्तान आणि अफगाणिस्तान सीमेवर प्रचंड प्रमाणात तणाव आहे. .  कोणताही देश जेव्हा त्याचे कर्जाचे हप्ते , तसेच आयातीचे शुल्क देवू शकत नाही, तेव्हा तो देश दिवाळखोर म्हणून जाहिर केला जातो. आजमितीस पाकिस्तानवर प्रचंड आंतरराष्ट्रीय कर्ज आहे. त्याचा पुर्ततेसाठी दर तीन महिन्यांनी पाकिस्तान मोठ्या प्रमाणात आपल्यकडील परकीय चलन आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध देश ,संस्था यांना देवून कर्जाची परतफेड करत असतो. त्याप्रमाणे 6डिसेंबर रोजी कर्जाचा हप्ता दिल्यानंतर पाकिस्तानकडे परकीय चलनाचा साठा जवळपास संपल्यातच जमा आहे. निर्यात जवळपास संपल्यातच जमा असल्याने नवे परकीय चलन मिळण्याचा मार्ग खुपच संकुचित आहे. ज्यामुळे पुढील  कर्जाचा हप्ता चूकवण्यासाठी परकीय चलन कुठुन आणायचे ?हा पाकिस्तानसमोरील मोठा प्रश्न आहे परदेशी माल पुरवठादारांना परकीय चलन न दिल्याने मोठ्या प्रमाणात विविध उत्पादने पाकिस्तानच्या बंदरात पडून आहेत. जेव्हा पाकिस्तानकडून  संबंधित परकीय माल पुरवठादारांना परकीय चलन देण्यात