पोस्ट्स

सप्टेंबर १८, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

ब....... बुद्धिबळाचा (भाग 8)

इमेज
                     भारतीय क्रीडाविश्व भारताचा बुद्धिबळ ऑलम्पियाडमधील पराभवामुळे काहीसे निराशजनक स्थितीत  भारताला सुखावणारी एक बातमी शनिवारी 18 सप्टेंबर रोजी सायंकाळी येऊन धडकली ती सुद्धा बुद्धिबळ क्षेत्रातून . हैद्राबाद येथील रुथ्वीक राजा हा भारताचा 70  वा  ग्रँडमास्टर बनल्याची ती बातमी होती . गेल्याच महिन्यात भारताला 69 वा ग्रँडमास्टर मिळाला होता त्या नंतर महिन्याभराचा भारताला पुढचा ग्रँडमास्टर मिळाल्याने नव्या 21 व्या शतकात जगाचे नेर्तृत्व करण्यास भारत पूर्णतः सज्ज झाल्याचे दिसून येत आहे . हंगेरी या देशाची राजधानी असलेल्या बुडापेस्ट मध्ये सुरु असलेल्या वेझरकेप्झो ग्रँडमास्टर बुद्धिबळ स्पर्धेत भारताला हा नवा हिरा गवसला आहे . सतरा वर्षीय रुथ्वीक राजा  यांनी या स्पर्धेत ग्रँडमास्टरसाठी   आवश्यक असणारा 2500  रेटिंगचा टप्पा ओलांडला आणि भारताला हा सुखद धक्का मिळाला .हैदराबादचे उपनगर असलेल्या सैनकपुरी येथील  श्री रामकृष्ण विद्यालय येथे 12 वीत शिकत असणाऱ्या रुथ्वीक रजा यांनी झरकेप्झो ग्रँडमास्टर बुद्धिबळ स्पर्धेच्या चवथ्या फेरीत या   यशाला गवसणी घातली ही स्पर्धा सुरु होण्या अगोदर त्यांचे इ