पोस्ट्स

जानेवारी २३, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

आत्महत्या: एक सामाजिक समस्या

इमेज
  आपले निर्माण करण्यात आलेले खोटे प्रतिष्ठेचे प्रश्न बाजूला ठेवून, आत्महत्या या गंभीर समस्येवर  आपण एकदिलाने काम करायची गरज असल्याचे, नाशिकमध्ये गेल्या वर्षभर झालेल्या आत्महत्येच्य संख्येने दाखवून दिले आहे. नाशिकसारख्या मध्यम आकाराच्या शहरात गेल्या वर्षी तब्बल ४१९  आत्महत्या झाल्या आहेत. सध्या कोव्हिड १९ च्या उद्रेकामुळे ताणतणावात वाढ झाली आहे, येत्या वर्षभरात जीवन पुर्वपदावर आल्यावर, या वाढलेल्या आत्महत्या देखील कमी होतील, असे मानने भाबडेपणाचे ठरेल. .  एखाद्याला वरकरणी छोट्या वाटणाऱ्या गोष्टी दुसऱ्या साठी खुप मोठ्या वाटू शकतात. त्यामुळे आत्महत्या या वरकरणी शुल्लक कारणासाठी होत आहेत, असे वाटत असले तरी त्याकडे दुर्लक्ष करता येत नाही. किंबहुना क्षुल्लक कारण एखाद्याला मोठे वाटते , हे आपले मानसिक आरोग्य किती धोकादायक स्थितीत आले आहेत, याचा वस्तस्थितीदर्शक पुरावाच मानावा लागेल.ज्याला यातील गांभीर्य समजेल त्याला यातील दाहकता समजेल  रस्त्यावर विचित्र पद्धतीने पुटपुटत, हातवारे करत फिरताना दिसणारे लोक म्हणजेच मानसिक रोगी, ही मानसिक रोगाची संकल्पना आपल्या समाजात मोठ्या प्रमाणात आढळते. तो एक मानस