पोस्ट्स

जून १५, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सुशांत सिह राजपुतचा अकाली जाण्याने निर्माण झालेले प्रश्न (भाग2)

इमेज
                                                                        आज दिवसभर समाजमाध्यमांमध्ये अभिनेता सुशांतसिंग राजपुत याचा आत्महत्येबाबत विविध पोस्ट वाचायला मिळाल्या .काही पोस्टमध्ये त्यास जगण्यास नालायक, पळपुटा अशी विशेषणे दिली गेल्याचे आढळले. त्याच्यापेक्षा अधिक अडचणीत दुःखात लोक असतात ,मात्र ते आत्महत्या करत नाही, तर सुशांतसिंग याने ती का केली,म्हणून प्रश्न उपस्थित केलेले आढळले .मात्र त्याच्यावर टिका करत असलेल्या कोणीही काही मुलभुत प्रश्नांकडे बघीतले नाही . त्या मुलभुत प्रश्नांकडे बघण्यासाठी हे आजचे लेखन                                                      आपल्याला साधे खरचटले,थोडेसे कापले तरी काही व्यक्ती त्या भागास किती मोठे बँंडेज लावतात, हे आपण बघतोच . इथे प्रश्न जीवाचा होता . अकबर आणि बिरबलाच्या कथेतील हौदातील माकडणीची गोष्ट आपल्याला माहिती आहेच, प्रत्येकाला आपला जीव प्रिय असतो, हेच या कथेत सांगितले गेले आहे कथेतील माकडीण आपला जीव वाचवण्यासाठी अखेर आपल्या पिल्लाचा जीव घेण्यासही कमी करत नाही, म्हणजेच कोणी स्वतःहुन आपला जीव सहजासहजी देणार नाही .तर तो वाचवण्यासाठी सातत