पोस्ट्स

जानेवारी १७, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

महाराष्ट्र राज्य परिवहन सेवेला झालेला कर्करोग .......

इमेज
                 आज फेसबुकवर सहज सर्फिंग करत असताना एका दैनिकाच्या बातमीच्या कात्रणांचा फोटो दिसला . बातमी आपल्या महाराष्ट्र एसटी विषयी होती . त्या बातमीत सांगितले होते की आपल्या महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या लांब पल्ल्याचा आणि आंतरराज्य बसेस कमी असल्याने महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळास प्रचंड प्रमाणात तोटा होत आहे . मी स्वतः याचा अनुभव घेतला आहे . माझे आजचे लेखन महाराष्ट्राच्या एसटीला असणाऱ्या या महत्वाच्या मात्र काहिस्या न चर्चिल्या जाणाऱ्या बाबींविषयी        तर मित्रानो , मी अनेकदा नाशिकला राजस्थान राज्य परिवहन मंडळाची शिर्डी ते उदयपूर अशी बस बघितली आहे  या बाबत मी नाशिकला अधिक चौकशी केल्यावर समजले की ही बस रोज धावते .  हे फक्त प्रातिनिधिक उदाहरण झाले . नाशिकहून कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाच्या   3 बसेस बेळगावला जातात तर एक बस रायबागला जाते . मात्र नाशिकहून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची एकही बस कर्नाटकमध्ये जात नाही . गोवा राज्याच्या परिवहन मंडळाची  एक बस पंढरपूर येथून पणजीला जाते . याउलट महाराष्ट्राची एकही बस पंढरपूरहून पणजीला जात नाही . मी एकदा पुण्याला गुजरात राज्य प