पोस्ट्स

एप्रिल ९, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

नाँट आउट 168 !

इमेज
      येत्या 16 एप्रिलला आपली भारतीय रेल्वे नाबाद 168 वर्षे पुर्ण करुन 169 व्या वर्षात पदार्पण करत आहे. त्या बद्दल समस्त भारतीयांचे मनःपूर्वक अभिनंदन. आपली भारतीय रेल्वे आशिया खंडातील पहिली रेल्वे आहे. आजमितीस रेल्वेच्या 17 उपकंपन्या (RVNL, IRCTC, Railtel ,RECON वगैरे) { मनमाड -इंदोर, नाशिक पुणे रेल्वेमार्गाची  उभारणी करण्यासाठी उभारलेल्या कंपन्या आदी प्रादेशिक कंपन्या वेगळ्या त्या या 17 मध्ये येत नाहीत} उभारण्यात आलेल्या आहेत.  17 प्रकारच्या विविध रेल्वे (राजधानी, दुरंतो, राज्यराणी, गरीबरथ वगैरे) तसेच 9 प्रकारच्या डब्यातून (एस टु टायर, एसी चेअर कार, स्पिलर, जनरल वगैरे)  आँस्ट्रोलिया या देशाच्या एकुण लोकसंख्येएव्हढ्या (सध्याचा कोरोना कालखंड वगळू या ) प्रवाश्यांची वाहतूक करणारी भारतीय रेल्वे  जगातील सर्वात मोठा सार्वजनिक उपक्रम आहे. लवकरत संपुर्णतः विद्युतीकरण झालेली जगातील पहिली रेल्वे म्हणून आपली भारतीय रेल्वे ओळखली जाणार आहे. रेल्वे रूळांच्या बाबतीत आपली भारतीय रेल्वे जगात चौथ्या क्रमांकाची रेल्वे आहे. अशी भारतीय रेल्वे 169  व्या वर्षात पदार्पण करत आहे. त्याबद्दल तीचे कौतूक करावे तित