पोस्ट्स

मार्च ५, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

भूतान मध्ये रंगणार नाट्य !

इमेज
          आपल्या भारताच्या शेजारच्या देशांमध्ये विविध घडामोडींनी वेग घेतला आहे. काही घडामोडी राजकीय स्वरुपाच्या आहेत.तर काही घडामोडी मोठ्या घोटाळ्यामुळे चर्चेत आलेल्या आहेत .  भूतान सारखे जागतिक राजकारणापासून कोसो मैल दुर राहणारे, भारताच्या संमतीशिवाय अन्य कोणाशी परराष्ट्रीय सबंध न ठेवणारे राष्ट्र देखील याला अपवाद ठरलेले नाही.              तर मित्रांनो, भूतानच्या राजघराण्याचे संरक्षण करणाऱ्या दलातील सदस्य ब्रिगेडीयर थिनले  भूतान सर्वोच्च न्यायालयाचे  वरीष्ठ न्यायाधीश क्वीनले शेअरींग आणि एक साह्ययक न्यायाधीश येशव दोजी यांच्यावर राजघराण्याविरुद्ध आणि सर्वोच्च न्यायालयाविरुद्ध षडयंत्र रचल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.  त्यांनी भूतानच्या राजघराण्यातील धोका उत्पन होईल, असे वर्तन करणे, वशिलेबाजी, भूतानच्या राजघराण्याचे संरक्षण करण्यासाठी असलेल्या दलासाठी असणाऱ्या पैसाचा दुरापयोग करणे, तसेच अयोग्य पद्धतीने कर्जप्रकरण मंजूर करणे हे आरोप  ठेवण्यात आले आहे. सध्या शांततामय  तसेच आनंदीमय जीवनाची जगाला देणगी देणाऱ्या भूतानमधील जनजीवन यामुळे पुर्णतः ढवळून निघाले आहे.            गेल्या 2वर्षापासून भूत

पुन्हा अस्थिरतेच्या वळणावर पाकिस्तान

इमेज
    आपल्या भारताबरोबरच स्वतंत्र्य झालेल्या मात्र सुरवातीपासूनच लोकशाहीचा खेळखंडोबा झालेल्या पाकिस्तानात पुन्हा एकदा लोकशाही धोक्यात आली आहे. आपल्या भारताच्या  राज्यसभेच्या समकक्ष असणाऱ्या पाकिस्तानातील केंद्रीय विधीमंडळात अर्थात सिनेटमध्ये सदस्य निवडून आणण्यात सत्तारुढ पक्षाला अपयश आल्याने विरोधी पक्षांनी शनिवार दिनांक 5 मार्च 2021 रोजी अविश्वासाचा ठराव मांडण्याचे ठरवले आहे. जर हा ठराव समंत झाल्यास तेथील विधीमंडळ विसर्जीत होवून नव्या निवडणूका होतील. पाकिस्तानचा इतिहासात सध्याचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या आधी नवाज शरीफ हे एकमेव पंतप्रधान आहेत. ज्यांनी त्यांचा 5 वर्षाचा कालावधी पुर्ण करुन दुसऱ्या लोकनियुक्त सरकरकडे सत्ता हस्तांतरीत केली. नवाज शरीफ आता पर्यत 4ते5 वेळा पाकिस्तानचे पंतप्रधान झाले आहेत. त्यातील एकदाच त्यांनी त्यांचा पुर्ण 5वर्षाचा कार्यकाळ पुर्ण केला आहे. तो अपवाद वगळता पाकिस्तानात एकतर लष्करी उठाव किंवा भष्ट्राचाऱ्याचा आरोप , हत्या , निधन यामुळेच पाकिस्तानातील पंतप्रधान बदलला जातो.       पाकिस्तानातील वरीष्ठ सभागृहातील(आपल्या राज्यसभा समकक्ष) सदस्य तेथील कनिष्ठ सभागृहातील