पोस्ट्स

सप्टेंबर २९, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

अति तिथे माती किती खरे समजण्यासाठी वाचावे असे पुस्तक The evil eye of Chess

इमेज
          आपल्याकडे एक संस्कृत वचन प्रसिद्ध आहे ," अति सर्वत्र वर्जयते ", अर्थात कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच असतो . रोजच्या जीवनात आपण याचा अनुभव सुद्धा घेत असतो . आपल्या रोजच्या जगण्यात सर्वच क्षेत्राला हे तत्व लागू   होते . अगदी बुद्धिबळ सारख्या खेळात सुद्धा हे तत्व लागू होते . चमकलात ना ? हो बुद्धीबळ सारख्या खेळात देखील अति तिथे माती हे तत्व लागू होते . ते कसे लागू होते , हे समजण्यासाठी आपण आशिया खंडातील पहिले बुद्धीबळविषयक   ऍप   आणि संकेतस्थळ तयार करणाऱ्या श्री . विनायक वाडीले यांनी लिहिलेले इंग्रजी पुस्तक " The evil eye of Chess" जे मी नुकतेच वाचले .           या पुस्तकात आठ अस्या जगविख्यात बुद्धीबळपटुंची ओळख करून देण्यात आली आहे की , ज्यात बुद्धीबळाविषयक मोठी गुणवत्ता अगदी ठासून भरली होती . मात्र मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक हे तत्व त्यांनी आचरणात न आणल्यामुळे त्यांचा अंत फारच हृदयदायक झाला , एकाला आयुष्याचा शेवटची काही वर्षे मनोरुग्णालयात काढावी