पोस्ट्स

जानेवारी २७, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पाकिस्तानचा पाय खोलात!

इमेज
          एखाद्याचा पाय खड्ड्यात जायला लागला तर एका पायाबरोबर दुसराही पाय खड्ड्यात जायला लागतो, असे म्हणतात.आपल्या भारताचा पश्चिमेकडील शत्रू अर्थात पाकिस्तानला ही स्थिती तंतोतत लागू होण्याची स्थिती निर्माण झाली तर नाहीना? अस्या दोन घटना गेल्या आठवड्यात घडल्या . या घडामोडींचा परीणाम भारतावर देखील होणार असल्याने त्याविषयी सांगण्यासाठी हे लेखन .      तर मित्रांनो, ट्रान्सफरन्सी इंटरनँशनल या संस्थेमार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या करपसन परस्पेशन इंडेक्स द्वारा पाकिस्तानात मागील काही वर्षांत भष्ट्राचार प्रचंड वाढला असल्याचे स्पष्ट झाले आहे. ज्यामुळे समाजमाध्यमांमध्ये पाकिस्तानाचा पंतप्रधान इम्रान खान याचा विरोधात टिकेचा सुर उमटत आहे. याच संस्थेचा  याच इंडेक्सचा विचार करता इम्रान खान सत्तेत येण्या आधी स्थान 116 होते जे आता 140 पर्यत घसरले आहे. सर्वात कमी भष्ट्राचारी देशास एक क्रमांक तर सर्वात भष्ट्राचारी देशास शेवटचा क्रमांक या पद्धतीने आपण याकडे बघायला हवे.इम्रान खान पाकिस्तानातील भष्ट्राचार कमी करण्याचे आमिष दाखवत सत्तेत आले होते.जे फोल गेलेले दिसत आहे. ज्यामुळे त्यांची उचलबांगडी करावी, असा