पोस्ट्स

नोव्हेंबर ४, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

चीनचा विळखा ?

इमेज
चीन आपल्या भारताचा एक प्रबळ शत्रू, अनेकांना ज्याचे  नाव घेतले तरी  तळपायाची आग मस्तकात  जाते असे राष्ट्र. आपल्या भारताच्या विरोधात विरोधात अनेक जागतिक व्यासपीठावर अधिकृत अथवा छुप्या पध्द्तीने बाजू घेणारे राष्ट्र . या चीनच्या संदर्भात 3 घडामोडी गेल्या आठवड्याभरात घडल्या. आपल्या पारंपरिक माध्यमांनी या घडामोडीकडे काहीसे दुर्लक्ष झाल्यामुळे त्या विषयी सांगण्यासाठी आजचे लेखन.                            तर मित्रांनो, बांगलादेशाने चीनला त्यांचे बंदर विकसीत करण्यापासुन रोखल्यानंतर चीनने पाकिस्तानमधील सर्वात मोठे शहर जे त्यांचा सिंध प्रांताची आणि पाकिस्तानची आर्थिक राजधानी आहे, अस्या कराची जवळील दोन बेटे  विकसीत करण्यासाठी पाकिस्तानबरोबर करार केला आहे. त्यासाठी चीन त्या ठिकाणी त्याचा तळ देखील विकसीत करणार आहे. हे काम सोपे व्हावे यासाठी करोनामुळे लॉक डाऊन असताना पाकिस्तानच्या सरकारने एक अध्यादेश काढला आहे कराचीच्या समुद्रापासून मुंबईचा समुद्र किनारा अत्यंत जवळ आहे, हे आपणास ज्ञात आहेच. त्यामुळे  भारताच्या इतक्या जवळ चीनने आपला तळ उभारणे, भारतासाठी निश्चितच चांगले नाही.