पोस्ट्स

ऑक्टोबर ९, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

भारत बांगलादेश मैत्री नव्या वळणावर

इमेज
    बांगलादेश, भारताबरोबर जगातील कोणत्याही दोन देशांतील सिमारेषेचा  किलोमीटर संदर्भात विचार करता दुसऱ्या क्रमांकाची सर्वात जास्त लांब सीमारेषा असणारा देश. भारताच्या मदतीने स्वतंत्र मिळालेला देश बांगलादेश. तर या बांगलादेशचे परराष्ट्र मंत्री अद्बुल मोमेन यांनी भारताकडे  बांगलादेश आणि भारताची सीमा, भारत नेपाळ किंवा भारत भुतान प्रमाणे खुली करण्याची मागणी केल्याने, भारत बांगलादेश सबंध पुन्हा एकदा चर्चेत आले. भारत सरकारने नेपाळ आणि भुटानच्या सरकारशी केलेल्या करारानुसार त्या देशातील नागरिक भारतात आणि भारतीय नागरिक त्यांच्या देशात व्हिसाशिवाय सहजतेने जावू शकतात. तिच सवलत भारताने आता बांग्लादेशाला देखील लागू करावी,असा या मागणीचा अर्थ आहे. भारताने असी सवलत  बांग्लादेशाला दिल्यास बांगलादेश देखील भारतीयांना ही सवलत लागू करेल,असे या मागणीच्या वेळी बांगलादेशाकडून सांगण्यात आले आहे ‌.                          सध्या भारत जगातील पाचवी मोठी अर्थव्यवस्था असली, तरी नजीकच्या भविष्यकाळात ती जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था सहजतेने होवू शकते‌ ज्यामुळे भारतात सातत्याने रोजगाराच्या नवनवीन संधी निर्माण होणार आहेत